तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 15 May 2020

लेडी सिंघम मंजुषा मोरे यांची अवैध गुटखा विक्री दुकानावर धाड,हजारोंचा गुटखा जप्तपोलिसांच्या कारवाईने अवैध गुटखा व्यावसायीकांचे धाबे दणानले

मंगरुळपीर(फुलचंद भगत)- जुनी न.प.च्या उर्दु शाळेच्या मागे चेहेलपुरा येथील अब्दुल राजीक अब्दुल रजाक यांच्या घरी गुटका विक्रीकरीता ठेवला असल्याच्या गोपनिय माहीतीच्या आधारे पोउनि मंजुषा मोरे यांच्या नेतृत्वात मंगरुळपीर पोलिसांनी छापा टाकुन ३५३४६ रुपयाच्या कीमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे.
          मंगरूळपीर पोलिसांना गुटक्याविषयी गोपनिय माहीती मिळाली याबाबत पोलिस निरिक्षक मंगरुळपीर यांना कळवुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली नापोकाॅ अमोल मुंदे सोबत पंच व पोलिस स्टाफ घेवुन पोलिस ऊपनिरिक्षक मंजुषा मोरे ,पोकाॅ परसुवाले,शिंदे,संदिप खडसे यांना घेवुन अब्दुल राजिक अब्दुल रजाक यांच्या घरी जावुन त्याला बाहेर बोलावुन नाव विचारले असता त्याने त्याचे नाव अब्दुल राजीक अब्दुल रजाक असे सांगीतले.त्यास पंचासमक्ष दुकानाची झडती घेन्याचे कारण समजावुन सांगीतले व दुकानाच्या आत जावून झडती घेतली असता आत ७ पांढरे कट्टे मिळून आलेत.सदर कट्टे आपलेच असल्याचे व त्यामध्ये गुटका विक्रीकरीता असल्याचे पंचासमक्ष वर नमूद व्यक्तीने सांगीतल्यानंतर ते जप्त करन्यात आले.त्या कट्यामध्ये विविध कंपनिचा जवळपास ३५३४६ रुपये किमतीचा गुटका आढळून आला.सदर कारवाई वाशिमचे पोलिस अधिक्षक वसंत परदेशी,अप्पर पोलिस अधिक्षक विजयकुमार चव्हाण,पोलिस ऊपविभागिय अधिकारी यशवंत केडगे,ठाणेदार धनंजय जगदाळे यांच्या मार्गदर्शनात करन्यात आली.पुढील तपास मंगरुळपीर पोलिस करीत आहेत.या गुटखा जप्तीच्या कारवाईमुळे अवैध गुटखा व्यापाराचे धाबे दणानले आहेत.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a comment