तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 22 May 2020

पांगरी(गोपीनाथ गड)चे भगीरथ.. वाल्मिक अण्णा कराड मुख्यमंत्री पेय जल योजना कार्यान्वित


  विकासाची गंगा  वाल्मिक अण्णा कराड यांच्या माध्यमातून गावात आलेली आहेच,पण  आज विशेष म्हणजे नागापूर ते पांगरी मुख्यमंत्री पेय जल पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले.पाणीत टाकीत पडलं, यापुढे पांगरी वासीयांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळणार आहे.खऱ्या अर्थाने गावकाऱ्यासाठी आज सोनियाचा दिनु!


पार्श्वभूमी

 यापूर्वी ही गावपातळीवर तात्पुरत्या स्वरूपाची पाणी पुरवठा योजना कार्यरत होती, पण,विहिरी ला पाणी नसल्याने उन्हाळ्यात बोंबाबोंब असायची. लोकसंख्या आणि गावाचा विस्तार वाढल्यामुळे तत्कालीन योजना कुचकामी तोकड्या पडत होत्या.गरज होती ती अशा कायम स्वरूपी व्यापक पाणी पुरवठा योजनेची.यापूर्वी पांगरी गावाचा समावेश संगम 18 खेडी पाणी पुरवठा योजनेत केला होता. फार कमी कमी काळ ही योजना कार्यान्वित राहिली, समन्वयाचा अभाव,आणि विजबिलाची देयके ग्रा.प.कडून थकल्याने याही योजनेचा बोजवारा उडाला.आणि पाणीप्रश्न आणखीनच गंभीर बनत गेला.जवळ विहिरी असणाऱ्यांनी स्वतःच्या पाईपलाईन घरी आणल्या.पण शेत जवळ नसलेले ,ज्यांना शेती नाही असे जवळपास 80%कुटूंबाचे पाण्यासाठी हाल होत होते.काही दिवस स्व. मुंडे साहेब असताना कारखान्याची पाईपलाईनला 2स्टँड पोस्ट काढले होते, त्यावर कसे तरी पांगरी कॅम्पवरचे लोक  पाण्याची तहान भागवायचे, पण साहेबांच्या निधनानंतर ते स्टँड पोस्ट बंद करण्यात आले आणि पांगरी आणि परिसरात पाण्यासाठी वणवण सुरू झाली.2014 ते अद्याप पर्यंत हक्काचे आणि कायमस्वरूपी पाणी पांगरी करांना मिळालं नाही.या योजनेच्या माध्यमातून कायमस्वरूपी हक्काच पाणी पांगरी च्या जनतेला मिळालं.

संकल्पना ते योजनेचा प्रवास

2012 च्या ग्रा. प.निवडणुकीत वाल्मिक अण्णा कराड यांनी प्रत्यक्षात भाग घेतला, यापूर्वी ते गावच्या राजकारणात पडले नाहीत.अण्णांच्या नेतृत्वाखाली ग्रा. प. निवडणूक जिंकली.आम्ही गावच्या विकासाचा जाहीरनामा तयार केला होता, समाज मंदिर समोर झालेल्या सभेत तो मी  वाचूनही दाखवला.त्यात पहिल्या क्रमांकावर नागपूर धरणातून पाणी पुरवठा योजनेला प्राधान्य होतं तशी ती संकल्पना माझीच,मी अण्णांच्या डोक्यात घातली.आण्णांनी त्यासाठी लगेच पाठपुरावा सुरु केला, तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण राव ढोबळे यांच्या पूर्वसंमतीने प्रस्ताव आणि तांत्रिक बाबीची पूर्तता करून प्रस्ताव सादर केला तोपर्यंत राज्यात सत्ता परिवर्तन झाले.2014 ते 2019 पर्यंत तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा विद्यमान मंत्री महोदय श्री. धनंजय मुंडे साहेबांनी प्रतिष्ठा पणाला लावून पांगरीकरासाठी मंजूर करून घेतली. योजना मंजुरी मध्ये श्रेयासाठी विरोधकांनी राजकारण तर केलं पण अडथळे निर्माण केले. पण 15 ऑगस्ट 2017ला मा. धनंजय मुंडे साहेबांनी पांगरी कॅम्पच्याहनुमान मंदिरा समोरील भर सभेतून तत्कालीन पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना फोन लावला आणि दम भरला,जर पांगरीची(गोपीनाथ गड) पाणीपुरवठा योजनेला15 दिवसात मंजुरी दिली नाही तर मी स्वतः आपल्या मंत्रालयाच्या समोर उपोषणाला बसणार आहे. आणि तात्काळ मंजुरी मिळाली.आज मनस्वी आनंद आहे की,ही योजना पूर्णत्वास येऊन पांगरीकरांची पाण्यासाठी वणवण थांबणार आहे.मनस्वी समाधान वाटतंय आपल्या संकल्पनेला मूर्त स्वरूप प्राप्त झालं आहे.त्याचबरोबर जनकल्याणकारी पाणीपुरवठा योजनेसाठी शह काटशहाच्या राजकारणामुळं इतका वेळ लागला,याचा खेदही वाटतो. चलो'देर आये दुरुस्त आये'..

साभार🙏

सामाजिक न्याय मंत्री,मा.ना. धनंजय मुंडे साहेब आपल्या प्रयत्नाने,मा.वाल्मिक अण्णा कराड आपल्या पाठपुराव्याने ही योजना कार्यान्वित करून पांगरिकरांची पाण्याची भटकंती थांबवली.गावकऱ्यांच्या वतीने तुमचे शतशः आभार!
   विशेष आभार :पिंटू मुंडे उपसभापती परळी प.स.
    पिंटू मुंडे चे आभार व्यक्त न केल्यास अन्याय कारक होईल कारण या सर्व योजनेसंदर्भात तांत्रिक बाबी आणि कागदोपत्री पाठपुरावा त्यांनीच केला आणि योजनेच कामसुद्धा पूर्ण केलं
    

No comments:

Post a comment