तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 23 May 2020

हिवरखेडा येथील महावितरण विभागाने मान्सुनपुर्व मेंटनन्स आणी ट्रि कटिंगची कामे पुर्ण करावी






वारंवार विज खंडित होणार नाही याकडे लक्ष द्यावे



 साखरा .प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे 

सेनगाव  तालुक्यातील हिवरखेडा येथील खरीपाच्या हंगामाला सुरुवात झालेली असुन शेतकरी आणि  नागरीक यांना मदत होइल अशी मान्सुनपुर्व कामे महावितरण विभागाने पुर्ण करावी अशी मागणी पत्रकार शिवशंकर निरगुडे  यांनी केली आहे.
           महावितरण विभागाने मान्सुनपुर्व कामांचा आढावा घ्यावा. ग्रामिण भागात खरीपाचा हंगाम सुरु झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात ट्रान्सफार्मर जळन्याचे प्रमाण वाढते.ते वेळेवर न मिळाल्यामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसानही होते.असे होवु नये त्यासाठी महावितरणने ट्रान्सफाॅर्मरचा प्री स्टाॅकही ऊपलब्ध करावा ग्रामीण भागांमध्ये वादळी वार्‍यांमुळे विद्दुत तारांवर झाडे झुडपे पडुन अपघात होन्याची शक्यता आहे अशा ठिकाणी झाडे तोडन्याची त्वरीत व्यवस्था करावी जेणेकरुन अपघात होणार नाही तसेच विद्दुत तारांवर झाडे,फांद्या पडुन विज खंडित होणार नाही.महावितरणे आतापासुन मान्सुनपुर्वची कामे मार्गी लावावीत आणी जे कंञाटदार मेंटेनन्सची कामे वेळेवर करीत नाहीत अशा कंञाटदारांना काळ्या यादीत टाकावे.विज ग्राहकांना कुठलीही गैरसोय होणार नाही.पावसाळ्यामध्ये वारंवार विज पुरवठा खंडीत होणार नाही याकडे महावितरण अधिकार्‍यांनी लक्ष द्यावे व त्यासंदर्भातली कामे त्वरीत मार्गी लावावी.सध्याही सेनगाव  तालुक्यातील  हिवरखेडा येथे विज नेहमी खंडीत होत असुन यामुळे नागरीक ञस्त होत आहेत हिवरखेडा गावातील पूर्ण विद्यूत तारे लोंबकळत आहेत पूर्ण गावातील तारे पावसाळा लागण्याच्या अगोदर बदलून नवीन टाकावी तसेंच अर्ध्या गावात एकच फ्यूज आहे आणि तो वार वार जात राहतो त्या ठिकाणी नवीन तारे टाकून पूर्ण फ्यूज देण्यात यावे तसेंच गावातील काही विद्यूत खांब वाकले आहेत ते नवीन टाकून द्यावे तसेंच हिवरखेडा येथील विद्यूत रोहित्र हें जिल्हा परिषद शाळेतील किंडागणात आहे ते उचलून दुसरी कड़े बसवण्यात यावे तसेंच विद्यूत रोहित्राला एकहि फ्यूज कॉल नाही पूर्ण पणे उघडे आहेत पूर्ण फ्यूज कॉल नवीन टाकण्यात यावे अशी मागणी उप कार्यकारी अभियंता सेनगाव यांना mscb ला वारंवार कळविले आहे प्रहार चे जिल्हा अध्यक्ष अँड विजय राऊत यांनी सुध्दा उप कार्यकारी अभियंता वडगावकर यांना कळविले आहे हें त्वरित न जाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाकडून आंदोलन करण्यात येईल अशा इशारा येथील ग्रामस्थां कडून दिला जात आहे


प्रतिक्रिया 

आमच्या हिवरखेडा गावात गेल्या कित्येक दिवसांपासून विद्यूत प्रवाह करणारी तारे बदल्या गेली नाहीत त्यामुळे त्या पूर्ण पणे लोंबकळत आहेत व वार वार फॉल्ट होत आहेत तसेंच जिल्हा परिषद शाळेतील किंडागणात विद्यूत रोहित्र आहे ते उचलून बाहेर बसवण्यात यावे व गावातील पूर्ण तारे पावसाळा लागण्याच्या अगोदर नवीन टाकण्यात यावी तसेंच रोहित्राला नवीन फ्यूज कॉल टाकण्यात यावे
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन हि कामे पावसाळा लागण्याच्या आधी करण्यात यावी उप कार्यकारी अभियंता श्री वडगावकर साहेब यांना वार वार सूचना देऊन सुध्दा आत्ता पर्यंत कोणतेच काम केलेले नाही व तसेंच या भागात कायम स्वरूपी लाईनमेन देण्यात यावा अशी मागणी केली जात आहे 


अनिल गायकवाड मु .हिवरखेडा .ता .सेनगाव

No comments:

Post a comment