तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 22 May 2020

विजेचा शॉक लागुन न. प. कर्मचारी शेख इस्माईल यांचे दुःखद निधनपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- येथील नगर परिषदेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी शेख इस्माईल शेख मुस्तफा यांचे आज गुरूवारी सायंकाळी 6 वाजता शाॅक लागून दुःखद निधन झाले. या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 
        या र्‍हदयद्रावक घटनेबद्दल अधिक माहिती अशी की, आज दि. 20 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजण्याचे सुमारास शेख इस्माईल हा शहरातील पंचायत समिती परिसरात लाईटचे काम करत होता. यावेळी अचानक शेख इस्माईल यांना शाॅक लागला. ते जागीच बेशुद्ध पडले. शेख इस्माईल यांना तातडीने उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
          नगर परिषदेत विद्युत विभागात कंत्राटी कर्मचारी असलेले इस्माईल शेख यांचे दुर्घटनेत दुःखद निधन झाल्याचे समजताच ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी जमा झाली. कामाबाबत प्रचंड निष्ठा ठेवणारा,नगरसेवकांनी दिलेली जबाबदारी लीलया पार पाडणारा असा त्याची ओळख होती. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a comment