तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 22 May 2020

यंदा प्रथमच शनि भक्तांनी शनि जन्मोत्सव आपापल्या घरात साजरा केलापरळी वैजनाथ 22 (प्रतिनिधी) :-
              वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री.शनिमंदिर मध्ये गेल्या ४० वर्षांपासून शनैश्वर जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा प्रथमच येथील शनि भक्तांना शनैश्वर जन्मोत्सव शुक्रवारी (ता.२२) आपापल्या घरातच साजरा करावा लागला आहे.
            वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री.शनि मंदिरात वैशाख अमावस्येला शनि जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.शनि मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, पारायण, सात दिवस सप्ताहासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. ही धार्मिक परंपरा गेल्या ४० वर्षांपासून सुरू आहे. शेवटच्या दिवशी सायंकाळी सातच्या सुमारास गुलाल उधळून पाळणा हलवून शनि जन्मोत्सव साजरा करुन नंतर सर्वांच्या सहकार्याने महाप्रसादाचे आयोजन सर्व शनि भक्तांसाठी करण्यात येते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून दोन महिन्यांपूर्वी मंदिरे, प्रार्थना स्थळे बंद करण्यात आली होती. कोणतेही धार्मिक कार्यक्रम एकत्र न येता घरोघरीच साजरे करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता.२२) शनि जन्मोत्सव साजरा होणार असल्याने यंदा प्रथमच शनि भक्तांना जन्मोत्सव आपापल्या घरात साजरा करावा लागला. शनि भक्तांनी आपापल्या घरी सात दिवस परमरह्स पारायण केले. शेवटच्या दिवशी सायंकाळी बरोबर ७.०५ मिनीटांनी सर्वांनी हा जन्मोत्सव गुलाल टाकून साजरा करण्यात आला. मंदिरात पुजाऱ्याने पूजाअर्चा करुन हा जन्मोत्सव साजरा केला.

No comments:

Post a Comment