तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 27 May 2020

प्रशासनातला "माणुस" - बाबुराव रुपनर


     प्रशासन म्हटले की आजचे काम उद्यावर टाकणारी यंत्रणा. असा समज सर्वसामान्य नागरीकांचा आहे आणि त्यात काही वावगेही नाही. पण या समजाला गैरसमज ठरवणारेही काही "माणसं" आहेतच! अर्थात अशा माणसांची संख्या कमी असल्याने गैरसमज वरचढ ठरू लागला आहे. असे असले तरी आपले काम प्रामाणिकपणे नव्हे तर अगदी प्रमाणाबाहेर जाऊनही करणारे आहेत. काळ वेळेचे भान न ठेवता शब्दशः २४ तास नागरीकांसाठी आणि प्रशासनासाठी तयार असणारी माणसं आहेत. अगदी आपले काम "एकहाती" करून दोन हातावाल्यांना लावणारी त्यांची तडफ पाहता "प्रशासनातील माणुस" ही" आपला माणुस वाटू लागतो... आणि अशीच परिस्थिती सध्या परळीचे नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांची आहे. हा माणुस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशी मेहनत घेतोय की बघायचे काम नाही... कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तर या माणसाची आणि आरामाची भेटच होते की नाही देवच जाणो! 
        बाबुराव रूपनर यांचा दिवस पहाटे 5 वाजता सुरू होतो. भल्या पहाटे भाजीपाल्याचे नियोजन.,जिल्हाधिकारी राहुल रेखावर परळी चे.उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक  यांच्या मार्गदर्शनाखाली परळी चे तहसीलदार डॉ. विपीन पाटील पाटील यांच्यासोबत चेक पोस्टवर, न. प. मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्यासोबत शहराच्या नियोजनाबाबत चर्चा तर मध्येच अगदी साहेब, अंबाजोगाईला जाता येईल का ओ? अशा प्रश्नांची फोनवर उत्तरे द्यायची... प्रशासनाने तयार केलेली सर्व पथके कार्यरत आहेत का नाही याची खात्री करणे याची सतत चौकशी सुरू... परळी तालुक्यात ७ चेक पोस्ट आहेत. तर सकाळी सहा वाजता भाजीपाला भाजीपाला मार्केट भरते त्या ठिकाणी जाऊन न. प. कर्मचारी, कृषी ऑफिस कर्मचारी, पोलीस यांच्या मदतीने भाजीपाला आडत बाजार (गोपाळ टॉकीज मागे), कन्या शाळा रोड, पद्मावती गल्ली, विद्यानगर, इटके कॉर्नर आदी ठिकाणी शेतकरी व व्यापारी अनधिकृत भाजीपाला बाजार भरवत असतात तो न भरु देता प्रत्येक वार्डात विक्री करणेबाबत सूचना करणे. सकाळी 7 ते  9-30 मार्केटमध्ये गर्दी न होऊ देणे जिथे गर्दी असेल तिथे पोलीस पाठवून व न प कर्मचारी पाठवून तत्काळ गर्दी कमी करणे अशा सूचना, भेटी देऊन मार्गदर्शन करायचे आणि १० वाजता घरी जाऊन फ्रेश होऊन, जेवण करून कार्यालयात यायचे... आता बाजारपेठ दुपारी २ वाजेपर्यंत चालू असल्याने तिकडे अडचण आली की धावत जायचे.. कार्यालयात  नागरीकांच्या अडीअडचणी समजून घेणे व त्यांचे समाधान करणे. त्यात मध्येच कोणीतरी स्वस्त धान्य वाटपात घोळ होत असल्याची तक्रारी घेऊन येतो. मग थेट दुकानाला भेट देऊन जागेवरच तक्रारींचे निरसन करणे व खऱ्या व गरजू लोकांना धान्य मिळेल याची व्यवस्था करणे अशी कामांची मालिका थांबता थांबत नाही. 
         एवढ्यावरच कामे थांबत नाहीत. दररोज दुपारी ४ वाजता वा उपविभागीय अधिकारी डॉ. गणेश महाडिक किंवा तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांचे नियंत्रणाखाली न. प. मुख्याधिकारी अरविंद मुंडे, पंचायत समिती गटविकास अधिकारी संजय केंद्रे, तिन्ही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, डॉक्टर आणि इतर आवश्यक वाटत असतील त्यांचे समवेत आढावा बैठक घेऊन सर्व विभागांनी समन्वय साधायचा व दुसऱ्या दिवशी काय करायचे त्याचे नियोजन करायचे. नंतर रात्री 8 वजेपर्यंत कार्यालयीन कामकाज व दिवसभरयाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास कळवणे. सगळे अहवाल व उद्याचे नियोजन करून घरी जाणे. अगदी यंत्राप्रमाणे सतत काम आणि कामच! 
       नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांचा तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावात, अगदी सामान्य माणसांची ओळख असल्याने प्रत्येकजण साध्या कामासाठीही थेट त्यांनाच फोन करतात. विशेष म्हणजे त्यांचा फोन एकही मिनीट बंद नसतो. 24 तास फोन चालू ठेवून वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयाकडून येणारे आदेश रात्री उशिराही सर्व कार्यालय प्रमुख, पोलीस यंत्रणा, पत्रकार व वेगवेगले ग्रुप याना कळवणे. तसेच तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक याचे मार्फत रात्रीच ग्रुपद्वारे सर्व ग्रामीण भागात व शहरात न. प. मार्फत कळवणे. 
        बाबुराव रुपनर यांनी कोरोनाच्या विरोधात जोरदार मोहीम  उघडली आहे. सर्व विभागाशी समन्वय साधता यावा म्हणून फक्त कोरोना बाबत माहिती एकमेकांना कळवण्यासाठी 22 ग्रुप तयार केले असून सर्व माहिती ग्रुपवर देत असतात. त्यांच्या ग्रुपमध्ये सर्व कार्यलय प्रमुख, अधिकारी, कर्मचारी आणि प्रमुख नागरीक यांचा समावेश आहे. त्यामुळे वरिष्ठांचे आदेश, सुचना अवघ्या काही वेळात सर्वांपर्यंत पोहचतात. विशेष म्हणजे ही सर्व कामे ते एकाच हाताने करतात. कारण एका हाताने ते अपंग आहेत. पण त्यांनी त्याचा कधीच बाऊ केला नाही किंवा त्याचे भांडवल केले नाही. उलट हीच संधी म्हणून ते प्रत्येक काम स्वतः करतात. आपल्या कामात कुणाचीही मदत घेत नाहीत. वरिष्ठांचे डिटक्शन असो की ड्राफ्ट ते एकाच हाताने मोबाईलवर स्वतः टाईप करतात. 
     एकीकडे कोरोनाचा कहर थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच ईतर आघाड्यांवरही रूपनर यांचे काम सुरूच असते.  कोरोनाचा प्रादुर्भाव वाळूतस्करी, राख वाहतूक, अनधिकृत गौण खनिज वाहतूक व इतर व्यावसाईक यांचेवर कारवाई करण्यातही खंड पडू दिलेला नाही. 
        रोज 18 तास काम करणे व उरलेल्या 6 तासात फोन आला तर उत्तर देणे व लागलीच त्या ठिकाणी संबंधीत कर्मचारी पाठवून मदत करणे.सर्व कर्मचारी यांचे फोन 24 तास चालू आहेत.
 सवलत नाकारली 
         शासकीय सेवेतील बहुसंख्य अपंग कर्मचारी, अधिकारी हे शासनाकडून सवलती मिळाव्यात म्हणून प्रयत्न करतात. पण बाबुराव रुपनर यांनी अपंग अधिकारी कर्मचारी यांना मिळणाऱ्या सवलती, विशेष सूट, सवलत नाकारली आहे.बाबुराव रुपनर यांना  ऑफिस च्या सहकाऱयांचे व पत्नी छाया यांचे सहकार्य असते ,जिल्हाधिकारी बीड,उपजिल्हाधिकारी ,तहसीलदार परळी यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन असते

No comments:

Post a comment