तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 May 2020

परळीच्या लकीची मुंबईत वैद्यकीय सेवा ; एमबीबीएस शिक्षण पूर्ण करताच प्रशिक्षण काळात कोरोना कक्षात


महादेव गित्ते | 
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
        कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी विशेषतः डॉक्टर, पोलीस, प्रशासन रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. अशीच एक येथील डॉक्टर जिने नुकतेच एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण केले. आणि प्रशिक्षणास सुरुवात झाली. प्रशिक्षणाच्या सुरूवातीलाच कोरोनाची ड्युटी लागली. गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने न घाबरता प्रशिक्षणार्थी असतानाही ही ड्युटी करत आहे.
            येथील शास्त्रीनगर परिसरातील निवृत्त शिक्षक भिमाशंकर फुटके यांची मुलगी रेणुका फुटके हिचे नुकतीच एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झाले आहे. आपली मुलगी डॉक्टर झाल्याचा अभिमान भिमाशंकर फुटके यांना आहे. रेणूकाने मुंबई येथील सायन हाँस्पीटल म्हणजे लोकमान्य मेडिकल काँलेज मधून एमबीबीएस शिक्षण पूर्ण केल्याने परिवारातील सर्व सदस्य आनंदी होते. डॉ. रेणूकाची एक वर्षाच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली. आणि अचानक आपल्या देशात कोरोना विषाणूच्या प्रसाराला सुरुवात झाली. सर्वात अगोदर मेडिकल क्षेत्रातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवा म्हणून कामाला सुरुवात करावी लागली. डॉ. रेणूकाला अत्यावश्यक सेवा म्हणून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी लागली. मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची स्किनींग टेस्ट करावी लागत असे.काही दिवस येथे काम केल्यानंतर विमानांची उड्डाणे रद्द केल्यानंतर सेवनहिल्स कोविड दवाखान्यात काम करावे लागले. धारावी झोपडपट्टी मध्ये दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रभाव वाढत चालल्याने डॉक्टरांची कमतरता भासू नये म्हणून आम्हालाही धारावी मध्ये कोविड पेशंटला दवाखान्यात दाखल करणे तसेच काही नागरिकांना होमकाँरंटाईन करणे आदी कामे करावी लागली. या ठिकाणी काम करत असताना मला सतत या कोविड पेशंट मध्ये राहावे लागत असल्याने एकदिवस चक्कर आली.म्हणून तिथली ड्युटी बदलून कोविड दवाखान्यात देण्यात आली.है सर्व काम करत असताना माझ्या सोबत काम करणारे काही वरिष्ट डॉक्टरांना संसर्गही झाला. पण कोणीही काम थांबवले नाही. ज्या वरिष्ट डॉक्टरांना संसर्ग झाला त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर काही जण दुरुस्तही झाले आहेत.

यासंदर्भात डॉ. रेणुका फुटके यांनी सांगितले की, प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर महिना भरातच कोरोना विषाणूचा संसर्ग आपल्या देशात वाढायला सुरुवात झाली. आम्हाला  ज्यावेळी सांगितले की,तुम्हालाही प्रादुर्भाव कमी करण्यासाठी काम करावे लागणार आहे. त्यावेळी सुरुवातीला आम्ही घाबरलो कारण आम्ही नुकतेच हे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव नाही. आता काम कसे करायचे असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.त्यात कोरोना ड्युटी म्हणजे जिवाला धोका असे आम्हाला वाटत होते.पण कामाला सुरुवात केली. सुरुवातीला वाटणारी भिती नातेवाईक, परिवारातील लोकांच्या कौतुकामुळे  अभिमानाची गोष्ट झाली.आपण समाजासाठी काहीतरी चांगले काम करत आहोत.याचे समाधान वाटल्याने भिती दुर झाली.

No comments:

Post a comment