तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 17 May 2020

कसर येथे लॉकडाऊन मध्ये आदर्श विवाह पार पडला


मुख्यमंत्री सहाय्यता (कोविड-19) निधीस 10 हजाराची आर्थिक मदत

प्रतिनीधी जिंतूर
तालुक्यातील कसर येथे लॉकडाऊन मध्ये सोशल डिस्टनसिंगचे तंतोतंत पालन करत दिनांक 17 मे रोजी सकाळी 8 वाजता आदर्श विविह सोहळा पार पडला यावेळी नवदाम्पत्यांनी लग्नाला होणारा खर्च हा मुख्यमंत्री सहाय्यता कोविड 19 निधी देऊन वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
   तालुक्यातील कसर येथील गोविंदराव भराडे यांची मुलगी शितल हिचा विवाह सावरगाव येथील विनायकराव ढवळे यांचा मुलगा विश्वास यांचे विवाहबंध जुळले होते मात्र सध्या संपूर्ण भारतासह महाराष्ट्रात  कोरोना सारख्या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे या आजाराचा संसर्ग वाढू नये म्हणून सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे तसेच सार्वजनिक कार्यक्रम करणे यांच्यावरही निर्बंध घातलेले परंतु विवाह सोहळ्याची संपूर्ण तयारी झाली असल्याने विवाह सोहळा होतो की नाही याच विचारात दोन्ही कुटुंब होते. याबाबत संभाजी ब्रिगेडचे बालाजी शिंदे सोसकर,मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष गजानन चौधरी व बाळासाहेब काजळे यांनी पुढाकार घेऊन दोन्ही कुटुंबांशी चर्चा करून लॉकडाऊन मध्ये सर्व नियमाचे तंतोतंत पालन करत घरातच मोजक्या नातेवाईकांचा उपस्थित सोहळा पार पाडून मुख्यमंत्री सहाय्यता कोविड 19 ला मदत करण्याचे पुढे आले यासाठी दोन्ही कुटुंबांनी होकार दिल्याने 17 मे रोजी सकाळी 9 वाजता हा आदर्श विवाह सोहळा घरातच पार पडला तदनंतर नवदाम्पत्यांनी शहरातील तहसील कार्यालयात येऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 10 हजार रक्कमेचा धनादेश तहसीलर सुरेश शेजुळ यांच्याकडे सुपूर्त केला यावेळी अभिजित चौधरी व नवदाम्पत्याचे आई वडील उपस्थित होते
या आदर्श विवाह सोहळ्याचे सर्वत्र स्वागत होत आहे.

No comments:

Post a comment