तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 May 2020

रमेशअप्पा कराड यांनी घेतली विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ...!मुंबई (प्रतिनिधी) :-
विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य रमेशअप्पा कराड यांनी सोमवारी सदस्यत्वाची शपथ घेतली. विधान भवनात झालेल्या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कराड व अन्य सदस्यांचा शपथविधी सोहळा पार पडला.

यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, आ सुरजितसिंह ठाकूर, प्रवक्ते गणेशदादा हाके, माजी सभापती दिलीपराव देशमुख, माजी आ. सुधाकर भालेराव, अरविंद पाटील निलंगेकर यांच्यासह सौ. संजीवनी कराड व ऋषिकेश रमेशअप्पा कराड आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना रमेशअप्पा कराड म्हणाले की, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वात दोन दशकापुर्वी राजकीय, सामाजिक जीवनाची सुरुवात केली. लातूर ग्रामीण मतदार संघात प्रस्थापित शक्तीच्या विरुद्ध सातत्याने लढा देऊन संघर्ष करून गोरगरीब सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका घेऊन  सतत कार्यरत राहिलो. यामुळे मी आमदार व्हावे ही भावना गोरगरीब सर्वसामान्य जनतेची होती. आज विधान भवनात आमदार म्हणून शपथ घेतली आणि अनेक वर्षाचे अनेकांचे स्वप्न पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया कराड यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment