तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 19 May 2020

वाशिम जिल्ह्यात पाच जनांचे रिपोर्ट आले कोरोना पाॅजिटिव्ह


वाशिम- जिल्ह्यात मुंबई वरून आलेल्या 35 वर्षीय महिलेच्या कुटुंबातील 5 जणांचे  रिपोर्ट आज कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
वाशिम जिल्ह्यात मुंबई वरून 7 जण आले होते दरम्यान एका 35 वर्षीय महिलेची प्रकृती बिघडल्यानं त्या महिलेनं मुंबईच्या खासगी लॅब मध्ये कोरोनाची टेस्ट केली होती त्या टेस्ट चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं ती महिला पती,2 मुलं,1 नातेवाईक आणि 2 वृद्धांसह 16 मे च्या पहाटे थेट वाशिम च्या जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते.
या सर्व 7 जणांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्या महिलेच्या संपर्कात असलेल्या हायरिस्कमधील 5 जणांचे थ्रोट स्वॅब रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आल्यानं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
त्या महिलेच्या मुलाचा रिपोर्ट येणं बाकी आहे.
जिल्ह्यातील पुनः मुंबई वरून येणाऱ्यांमुळं कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 3  रुग्ण कोरोना बाधित होते त्यातील 2 जण कोरोना मुक्त झाले आहेत तर एकाचा मृत्यू झाला आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a comment