तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 16 May 2020

संभाजीनगर पोलिसांनी सात हजाराची शिंदी पकडली


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
 शहरातील फुले नगर भागात अवैधरित्या विक्री करण्यात येत असलेल्या शिंदी दारु अड्डयावर संभाजीनगर पोलिसांनी छापा टाकुन 7200 रु.ची शिंदी दारु जप्त केली.याप्रकरणी एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 शहरातील फुले नगर भागात लॉकडाऊन काळात बंदी असतानाही शिंदी दारुची सर्रासपणे विक्री होत होती.फुले नगर येथील फिरोज मुक्तार पठाण हे शिंदी विक्री करत असल्याची माहिती मिळताच आज दि.16 रोजी  संभाजीनगर पोलिसांनी  सदरील दारु अड्डयावर छापा टाकला यावेळी 120 लिटर शिंदी जप्त केली याप्रकरणी  दारूबंदी कायद्याअंतर्गत फिरोज पठाण याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a comment