तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 28 May 2020

वारकरी संप्रदायात महत्त्वाचे स्थान निर्माण केलेले "संत जगमित्रनागाचरित्र " असून श्रीजगमित्रनागा यांची कथा श्रवण म्हणजे पर्वणीच होय- सौ.अंजली ओक मुंबई


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- अनेक संताचे चरित्रे कालाच्या ओघात दूर्मिळ झाली आहेत.असेच संतश्रेष्ठ जगमित्रनागा महाराज यांचे चरित्र अहोरात्र संशोधन करून आपला वकीली व्यवसाय सांभाळून, अथक परिश्रमाने ह.भ.प.ॲड.दत्तात्रय महाराज आंधळे यांनी अलक्षित संत चरित्र लोकांचे समोर पुस्तक रुपाने आणले.जवळपास दहा वर्षांची मेहनत आहे.श्रीमहाराजांचे अभंग वाङ्मय शोधून ते काढले.आणि त्याच संशोधक तथा कीर्तनकार ॲड.दत्ता महाराज यांचे मुखातून अंतःकरणातील पूर्ण भावोत्कटतेसहित चरित्र (साधु मुखे किजे श्रवण) या उक्तीप्रमाणे
ऐकण्याचा योग ज्ञानाई सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून फेसबुकवर लाईव्ह येत असून गेले दोन दिवस हे आपण ऐकत आहोत संतजगमित्र यांची झोपडी रात्रीची पेटवून देऊन  सहकुटुंब जाळण्याचा प्रयत्न दूर्जन लोकांनी केला . शेवटी पांडुरंग भक्तांचे रक्षणासाठी धावले.हा प्रसंग खूप सुंदर कथन आज आंधळे महाराज यांनी केला.
उद्या दिनांक२९/५/२०२०  दुपारी बारा वाजता जगमित्राकरिता हाकेला वाघाचे रूपात श्रीविठ्ठल धावून आले.
आणि समाधीचे वर्णन ऐकण्याचा योग असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन सौ.अंजली ओक यांनी केले आहे.ज्ञानाई सोशल फाउंडेशनच्या कोमल सुर्वे तसेच त्यांचे टिमचे सर्व सदस्य व पिसिएन न्युज चँनेलचे सहकार्य लाभत आहे.

No comments:

Post a comment