तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 20 May 2020

जिल्ह्यात दुध पुरवठा करणार्‍या एजन्सीसाठी महत्वाची बातमीबीड (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील खाजगी व सहकारी दुध पुरवठा एजन्सींसाठी जिल्हा दुग्ध व्यवसाय विभागाने आज (दि.20) सूचना जारी केल्या आहेत. परवानगीशिवाय आता त्यांना दुध विक्री करता येणार नाही.

    जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांनी म्हटले की, दि.25 मे रोजी ईद निमित्त बीड जिल्ह्यात सर्व ठिकाणी दुधाचा पुरवठा करण्यासाठी खाजगी व सहकारी दुध पुरवठा एजन्सींनी तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत परवानगी घेणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी दुध विक्री करण्यास इच्छुक असल्यास सहकारी संस्था नोंदणी प्रमाणपत्र, खाजगी दुध पुरवठा करणार्‍या एजन्सीचे अन्न व औषध कार्यालयाचे परवाना पत्र, संबंधित पुरवठा करणार्‍या व्यक्तीचे आधार कार्ड परवानगी मिळविण्यासाठी लागणार असल्याचे जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment