तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 20 May 2020

मुंबई, पुणे आदी "रेड झोन" मधून परळी तालुक्यात आला लोंढा!समस्या वाढणार, विनापरवाना आलेल्यांची संख्या प्रचंड, लपून बसू नका - प्रशासनाचे आवाहन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  मुंबई, पुणे, औरंगाबाद आदी रेड झोनमधुन परळी तालुक्यात नागरीकांचे लोंढेच्या लोंढे दाखल होत आहेत. जिल्ह्य़ात आढळून आलेले नऊही कोरोनाग्रस्त हे बाहेरूनच आलेले असल्याने समस्या आणखी वाढणार आहेत. त्यातही विनापरवाना आलेल्यांची संख्या मोठी आहे. गुपचूप आलेल्यांनी लपून न बसता बाहेर येऊन स्वतः बाहेर येऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
        बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रवेश प्रशासनाने रोखला होता. मात्र मुंबई आणि पुण्याहून बेकायदा जिल्ह्यात आलेल्या नागरीकांच्या आडुन कोरोनाने प्रवेश केला आणि जिल्हावासियांची झोप उडाली आहे. आतापर्यंत तब्बल अकरा रूग्ण आढळून आले असुन एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. सहा जणांना उपचारासाठी पुण्याला हलवले आहे तर चौघांवर बीडमध्ये उपचार सुरू आहेत. बीड जिल्ह्य़ात प्रशासकीय यंत्रणेने मोठे प्रयत्न करून कोरोनाला जिल्ह्याबाहेर थोपवले होते, पण मुंबई, पुणे, औरंगाबाद आदी रेड झोनमधुन आलेल्यांनी बीड जिल्हावासियांच्या मेहनतीवर पाणी फिरवले आहे. रेड झोनमधुन शेकडो नागरिक विनापरवाना किंवा वशिलेबाजीने बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहेत आणि विशेष म्हणजे ते लपून बसले आहेत. यामुळे जास्त धोका निर्माण झाला आहे.
       परळी शहराच्या विविध भागात आणि ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर नागरीक आले असून बर्‍याच जणांच्या तपासण्या झाल्या नाहीत. ज्यांची तपासणी करून हातावर शिक्के मारुन होम क्वारंटाईन केले आहे तेही घरात बसुन राहत नाहीत. त्यामुळे ज्या त्या परिसरातील नागरिकांच्या झोपी उडाल्या आहेत. वेळोवेळी सुचना देऊनही ते ऐकत नसल्याने नवीनच समस्या निर्माण झाली आहे. यामुळे किरकोळ भांडणाचे प्रमाणही वाढले आहे.
       रेड झोनमधुन आलेल्यांनी स्वतः पुढे येऊन तपासणी करून घ्यावी असे प्रशासनाने अनेक वेळा आवाहन केले आहे. मात्र या अहवानाला प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे लोंढ्याचे लोंढे येत असले तरी तपासणी करून होम क्वारंटाईन करण्याचे प्रमाण अतिशय कमी इ. मात्र या नागरीकांच्या आडमुठे धोरणामुळे प्रशासनासमोर अनेक समस्या निर्माण होत आहेत. बाहेरून आलेल्या नागरीकांनी पुढे येऊन तपासणी करून घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment