तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 29 May 2020

शिक्षकांच्या प्रश्नाकडे काँग्रेस नेतृत्वाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज -प्रा मोहन रौंदळे अध्यक्ष अमरावती विभागसंग्रामपुर [ प्रतिनिधी]महाराष्ट्र राज्यातील उच्च माध्यमिक शाळांमधील प्राध्यापकांनी येत्या 1 जून 2020 पासून विविध मागण्यांसाठी राज्यभर आमरण उपोषण करण्याचे जाहीर केले आहे.यात राज्यातील जवळपास 22500 प्राध्यापक सहभागी होऊन राज्य शासनाचे विविध मागण्यांकडे सातत्याने होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडणार आहेत.आज संग्रामपुर तहसिलदार समाधान राठोड यांना विविध समस्या बाबतचे निवेदन देऊन कॉग्रेस नेतृत्वाने शिक्षकांच्या विविध समस्या कडे जातीने लक्ष देण्याची मांगणी  महाराष्ट्र राज्य माध्यमिक क म वी शाळा कृती संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्रा मोहन रौदळे सह पदाधिकारी यांनी केली आहे
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की,महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक क.म. वि. कृती संघटनेने राज्यातील उच्च माध्यमिक प्राध्यापक जे गेल्या अठरा ते वीस वर्षांपासून एक रुपयाही पगार न घेता विद्यादानाचे कार्य करत आहेत त्यांच्यासाठी वेळोवेळी आजपर्यत 300 पेक्षा अधिक आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधले आणि त्याचे फलित म्हणजे त्यांच्या या लढ्याला यश मिळून 19 सप्टेंबर 2019 रोजी शासनाकडून या शाळा (146 +1638)घोषित करण्यात आल्या व 1 एप्रिल 2019 पासून या प्राध्यापकांना 20 टक्के अनुदान देत असल्याचे जाहीर केले.त्यानंतर अर्थमंत्री मा.अजित पवार यांनी मार्च 2020अर्थसंकल्पीय अधिवेशनात लेखाशिर्ष ई-2-22020511 नुसार जवळपास 107 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करून घेतला.
या कामी आवश्यक असलेली संपूर्ण माहिती ही वित्त विभागाच्या दिलेल्या फॉरमॅट नुसार तपासणीअंती मंजूर रक्कम 106 कोटी 74 लक्ष 72 हजार रुपये मंजूर केले हा खर्च चालू वित्तीय वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविणे शक्य आहे.शासन पत्र दिनांक 26 फेब्रुवारी 2020 नुसार मागवलेली सर्व माहिती शासनास 58 मुद्द्यांच्या फॉरमॅटमध्ये पुरविण्यात आलेली आहे. एवढी सर्व किचकट प्रक्रिया पूर्ण करून देखील मंजूर झालेला निधी वितरणाचा शासन आदेश शासन अजून देखील निर्गमित करीत नाही. तो शासन आदेश त्वरित निर्गमित करुन या प्राध्यापकांना शासनाने न्याय द्यावा यासाठी कृती संघटनेमार्फत सदर आंदोलन करण्यात आल्याचे संघटनेने जाहीर केले आहे.दरम्यानच्या काळात अठरा ते वीस वर्षापासून उपेक्षित शिक्षकांमध्ये यानिमित्ताने एक आशेचा किरण पल्लवित झाला आणि शासन आपल्यावरील अन्याय दूर करेल असे सर्वांना वाटू लागले आणि याच काळात कोरोना सारख्या महाभयंकर साथीने राज्यामध्ये थैमान घालायला सुरुवात केली आणि निधी वितरण शासनादेश काढण्यास शासनाने वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले.
पुरवणी मागणी च्या माध्यमातून मंजूर निधीच्या वितरणाचा शासन आदेश निर्गमित होण्यास होत असलेल्या दिरंगाईमुळे अनेक विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हवालदिल झाले असून त्यांचे आर्थिक व मानसिक संतुलन बिघडत चालले आहे राज्यात यातून जवळपास 95 शिक्षकांच्या आत्महत्या झालेल्या आहेत मागील पंधरा ते वीस दिवसात पाच शिक्षकांचा या दिरंगाईमुळे तणावाखाली येऊन मृत्यू झालेला आहे.काहींनी आत्महत्या देखील केल्या आहेत. आता आणखी शासनाकडून उशीर झाल्यास यापेक्षाही अधिक वाईट घटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या विनाअनुदानित शाळांमध्ये काम करणारे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांना एकही रुपया वेतन मिळत नसून कुटुंबाचा खर्च भागविण्यासाठी शाळा वेळेव्यतिरिक्त बारा बलुतेदारांची कामे करून आपल्या जीवनाचा गाडा ते हाकत होते परंतु मार्च महिन्या पासून सुरु झालेल्या लॉक डाऊन मुळे सर्वजण घरातच अडकले व जे काही हाताचे काम होते तेदेखील मिळेनासे झाले आणि या शिक्षकांची उपासमार सुरू झाली. कृती संघटनेने हीच शिक्षकांची मानसिकता शासनाच्या समोर मांडण्यासाठी व त्यांच्या हक्काचा पगार मिळवून देण्यासाठी दिनांक 1 जून 2020 पासून राज्यभर घरात बसून कोरोना पार्श्वभूमीवर योग्य ते सामाजिक अंतर राखून आमरण उपोषण करण्याचा निर्धार केला असून जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण असेच सुरू राहील असा इशारा माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक कमवी शाळा कृती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष प्रा.संतोष वाघ,विभागीय अध्यक्ष प्रा मोहन रौंदळे जिल्हाध्यक्ष प्रा अरुण ढगे प्रसिद्धीप्रमुख  दीपक मोहोळ,प्रा रमेश बोडके ,प्रा अनिल डाबरे,प्रा देविदास भटकर ,प्रा गणेश जोशी,प्रा अजमल खा,प्रा प्रशांत वानखडे यांनी दिला आहे

No comments:

Post a comment