तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 23 May 2020

अंबाजोगाईच्या रुग्णालयास एमआयआर व व्हेंटीलेटर दिल्याने रुग्णांचे अचुक निदान होण्यास मदत ; ना.धनंजय मुंडे यांच्यामुळे रुग्ण सुविधा सुलभ-चंदुलाल बियाणी


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रलंबीत असलेला एमआयआर मशिन संदर्भात निविदा मागविण्यात आल्या असून लवकरच ती यंत्रणा उपलब्ध होणार आहे. तसेच कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी महत्वाची ठरणारी व्हेंटीलेटरची यंत्रणा ना.धनंजय  मुंडे यांच्या माध्यमातून उपलब्ध झाली असून रुग्णांच्या अचुक निदानासाठी ना.धनंजय मुंडे यांनी केलेली शासकीय मदत अत्यंत उपयुक्त व रुग्ण उपचाराचा दर्जा वाढविण्यास कारणीभूत ठरेल असे मत परळी आरोग्य मित्रचे अध्यक्ष  तथा नगरसेवक चंदुलाल बियाणी यांनी दिली. या बद्दल त्यांनी विशेष पत्राद्वारे ना.धनंजय मुंडे यांचे आभारही व्यक्त केले आहेत.
वैद्यकीय सेवेत अत्यंत मुलभूत समजली जाणारी एमआयआर रुग्णांचे विविध आजारांचे अचुक निदान करणारे यंत्रणा ना.धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालयास उपलब्ध होत आहे. मागील काही वर्षापासून प्रलंबीत असलेला हा प्रश्न तातडीने ना.धनंजय मुंडे यांनी सोडविला आहे. याबाबत निविदा मागविण्यात आल्या असून एमआयआर येत्या काळात उपब्लध होणार आहेत. परळी आरोग्य मित्रच्या वतीने आम्ही वैद्यकीय महाविद्यालयास पत्रकारांसह भेट दिली असता अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनीही एमआयआर मशिन असणे गरजेचे असल्याचे सांगीतले होते. त्याचवेळी आम्ही या बाबतचे निवेदन देऊन पाठपुरावाही केला होता. ना.धनंजय मुंडे यांच्या दूरदृष्टीतून हा प्रश्न आता निकाली लागल्याने समाधान वाटत असल्याचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी सांगीतले. दरम्यान कोरोना विषाणूच्या आजाराने त्रस्त झालेल्या रुग्णांवर उपचार करतांना व्हेंटीलेटरची गरज असते, ती सुद्धा ना.धनंजय मुंडे यांनी पुर्ण केली असून सोबतच वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सुविधेसाठी भरघोस निधी उपलब्ध करुन दिला आहे. याबाद्दल अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी आभार व्यक्त केले आहेत.
..............
राजस्थानी मल्टीस्टेट मुख्य शाखा वर्धापन दिन व महेश नवमी निमित्त
राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन

परळी । प्रतिनिधी
राजस्थानी मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी मुख्य शाखेचा 8 वा वर्धापन दिन आणि महेश नवमीचे औचित्य साधून विविध ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचे संपूर्ण नियम पाळून नागरीकांना घरबसल्या या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार असल्याची माहीती चेअरमन चंदुलाल बियाणी, उपाध्यक्ष बालचंद लोढा, सचिव बद्रीनारायण बाहेती यांनी दिली आहे.राजस्थानी मल्टीस्टेट को. ऑप.क्रेडीट सोसायटीच्या स्थापनेला येत्या महेश नवमीला 8 वर्षे पूर्ण होत आहेत. ही संस्था नवव्या वर्षात पदार्पण करीत असून, एव्हाण संपूर्ण मराठवाड्यात 13 शाखांचे जाळे निर्माण झाले आहे. परळी वैजनाथ येथे संस्थेचे मुख्यालय असून, महेशनगर औरंगाबाद येथील कॉर्पोरेट ऑफीसबरोबरच, वाळूज, राजा बाजार, माळीवाडा, जालना, अंबड, बीड, सिरसाळा, सोनपेठ, अंबाजोगाई, गंगाखेड आदी ठिकाणी संस्थेच्या शाखा आहेत.
हजारो सभासदांना आपल्याशी जोडून घेवून त्यांना आर्थिक सोयी सुविधा देण्यासाठी संस्थेने उत्तमरित्या नियोजन केलेले आहे. येत्या महेश नवमी निमित्त संस्था नवव्या वर्षात पदार्पण करीत असून, या पार्श्वभूमीवर विविध ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
महेश नवमी निमित्त भगवान महेशांच्या प्रतिमेची सजावट स्पर्धा, सामाजिक संदेश प्रसारीत होतील अशी स्लोगन स्पर्धा, कोरोना आजारावर जनजागृती करणारे निबंध स्पर्धा, गायन, वक्तृत्व, लहान मुलांसाठी टॅलेंट हंट, कुटूंब जाहिरात स्पर्धा, नृत्य आणि मिसेस क्वारंटाईन आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. घरातील गृहीणींपासून ते वयोवृध्द आजी-आजोबापर्यंत, तरूणांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांना या स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार आहे. याबाबत अधिक माहीती हवी असल्यास 9130072189 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वर्धापन दिनाची खास ऑफर
राजस्थानी मल्टीस्टेटच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त सभासद आणि ठेविदारांसाठी आकर्षक ऑफर देण्यात येत आहे. ज्यामध्ये 181 दिवसांच्या ठेवीवर 13 टक्के व्याजदर देण्यात येणार आहे. याचबरोबर संस्थेकडून सोने तारण कर्ज, वैयक्तीक कर्ज, मुदत ठेव कर्ज, बचतगट कर्ज सुविधा, गृह कर्ज, पगार तारण कर्ज, वाहन तारण कर्ज, कॅश क्रेडीट कर्ज, लॉकर सुविधा, सर्व शाखा ऑनलाईन, आरटीजीएस सुविधा आदी सुविधा देण्यात येत आहेत.

No comments:

Post a comment