तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 22 May 2020

मंगरुळपीर महावितरण विभागाने मान्सुनपुर्व मेंटनन्स आणी ट्रि कटिंगची कामे पुर्ण करावीवारंवार विज खंडित होणार नाही याकडे लक्ष द्यावे

सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांची मागणी

मंगरुळपीर(फुलचंद भगत)-खरीपाच्या हंगामाला सुरुवात झालेली असुन शेतकरी आणी नागरीक यांना मदत होइल अशी मान्सुनपुर्व कामे महावितरण विभागाने पुर्ण करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी केली आहे.
           महावितरण विभागाने मान्सुनपुर्व कामांचा आढावा घ्यावा. ग्रामिण भागात खरीपाचा हंगाम सुरु झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात ट्रान्सफार्मर जळन्याचे प्रमाण वाढते.ते वेळेवर न मिळाल्यामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसानही होते.असे होवु नये त्यासाठी महावितरणने ट्रान्सफाॅर्मरचा प्री स्टाॅकही ऊपलब्ध करावा.ज्या शहरी व ग्रामीण भागांमध्ये वादळी वार्‍यांमुळे विद्दुत तारांवर झाडे झुडपे पडुन अपघात होन्याची शक्यता आहे अशा ठिकाणी झाडे तोडन्याची त्वरीत व्यवस्था करावी जेणेकरुन अपघात होणार नाही तसेच विद्दुत तारांवर झाडे,फांद्या पडुन विज खंडित होणार नाही.महावितरणे आतापासुन मान्सुनपुर्वची कामे मार्गी लावावीत आणी जे कंञाटदार मेंटेनन्सची कामे वेळेवर करीत नाहीत अशा कंञाटदारांना काळ्या यादीत टाकावे.विज ग्राहकांना कुठलीही गैरसोय होणार नाही.पावसाळ्यामध्ये वारंवार विज पुरवठा खंडीत होणार नाही याकडे महावितरण अधिकार्‍यांनी लक्ष द्यावे व त्यासंदर्भातली कामे त्वरीत मार्गी लावावी.सध्याही मंगरूळपीर तालुक्यातील विज नेहमी खंडीत होत असुन यामुळे नागरीक ञस्त होतात लाइनमनला सुचना करुन अशा समस्या कायमच्या निकाली काढन्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांनी केली आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a Comment