तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 16 May 2020

यंग सिटीझन टीम चा 'कला असे मानवाशी भूषण' प्रतियोगीतेला उद्स्पुर्त प्रतिसाद


वाशिम(फुलचंद भगत)-कोरोना या महामारीला   क्षमवन्या करता लॉकडाउन ची  घोषणा केंद्र सरकारने केली असता आपण सगडेच या लॉकडाउनचा  काटेकोर पणे पालन करून देशहित जपत आहोत. या लॉकडाउनचा काळा मध्ये आपण आपल्या कला गुणांना वाव द्यावा. नवीन कला प्रकार युवकांनी शिकावे.कारण वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, 

कला असे मानवाशी भूषण, 
येरव्ही कोण पुसतो आणिक | 
तुम्ही  आहात  राव की रंक, 
यासी कोणी पुसेना || 
                      -राष्ट्रसंत 
कलेनेच माणसाची ओळख आहे 
आपण किती श्रीमंत व गरीब आहात याने फरक पडत नाही.वंदनीय राष्टस्तं श्री तुकडोजी महाराज आपल्याला  हे सांगून गेले. या लॉकडाउन च्या काळा मध्ये आपण सगडे  घरी थांबून कोरोना पासून देशाला वाचवण्यासाठी सहकार्य करत आहो. या कालावधी मध्ये आपल्या मधील दळलेले कला गुण निखरून यावे,  आपल्या मध्ये दळलेल्या सुप्त कला  गुणांना वाव मिळावा या करता यंग सिटीझन टीम अंतर्गत कला असे मानवाशी भूषण ही प्रतियोगिता आयोजित करण्यात आली  होती. या प्रतियोगितेला  तरुणांनी भरभरून प्रतिसाद  दिला. या प्रतियोगिते मध्ये नृत्य कला, कविता सादरीकरण, चित्र कला, गीत गायन या कलांचा  समावेश होता. यंग सिटीझन टीमचा वाशीम, अमरावती,  यवतमाळ, नागपूर ह्या जिल्ह्यातील सर्व शाखांमधून तरुणांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या लॉक डाउन मध्ये आपल्या मधील कला गुण उभारून यावे. आपल्यातील दळलेल्या कलाकाराला व्यक्त होण्याची संधी मिळावी,  या अनुषंगाने यंग सिटीझन टीम अंतर्गत कला असे मानवाशी भूषण प्रतियोगिता  राबविन्यात आली होती.या प्रतियोगिते मध्ये  गीत गायन स्पर्धे मध्ये संकेत राऊत याने बाजी मारली, कविता सादरीकरण प्रतियोगिता सुदर्शना झीले यांनी जिंकली. चित्रकला स्पर्धे मध्ये अंजली ठाकरे यांना बाजी मारली. आणी उत्तेजनार्थ बक्षीसांचे मानकरी वैशाली ढगे, रोहित ठाकरे, पूजा आडे, निकिता धुमारे ठरले. या प्रतियोगिते मध्ये बऱ्याच तरुणांनी भाग घेऊन आपल्यातील कला कौशल्याला वाव दिला. आपल्यातील कलाकार नेहमी  जागा राहावा आणि त्याचा कलेतुन समाज प्रभोधन व्हावे.हाच यंग सिटीझन टीमचा या प्रतियोगीते मागचा  उद्देश होता. या  प्रतियोगीतेच मूल्यांकन  सौं.प्रिया गुल्हाने आणि  सौं रश्मी इंगळे यांनी केले. या प्रति योगिताला यशस्वी करण्या साठी यंग सिटीझन टीमचे सूचित देशमुख,  अतुल खोपडे, मयूर पाटील, दीपक खांबलकर, अनुप इंगळे, करण मुंढे यांनी अथक परिश्रम घेतले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a comment