तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 15 May 2020

आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत चना खरेदी जिल्ह्यातील १३ खरेदी केंद्रावर सुरु बीड, दि.१४: बीड जिल्ह्यातील १३ खरेदी केंद्रावर शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत एफ.सी.आय.चना खरेदी सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांनी ज्या खरेदी केंद्रावर आपली नाव नोंदणी केली आहे त्या खरेदी केंद्रावरून शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर आलेल्या संदेश प्रमाणे दिलेल्या तारखेस आपला शेतमाल विक्रीस घेऊन जावे .
     ज्या शेतकऱ्यांनी अद्याप चना खरेदी साठी नाव नोंदिनी केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील पुढील प्रमाणे देण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर ऑनाइनला नोंदणी करावी. नोंदणीकरीता शेतकऱ्यांनी स्वतःचे आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँकची झेरॉक्स प्रत, ७/१२ आणि तलाठ्याकडून हस्तलिखित सही शिक्याचा पीकपेरा दाखला ही कागदपत्रे घेऊन नोंदणी करून घ्यावी. यासाठी तालुक्यातील खरेदी सब एजन्ट सहकारी संस्थांची नावे  जाहीर करण्यात आली आहेत असे जिल्हा सह निबंधक (सहकारी संस्था )  शिवाजी बडे यांनी कळविले आहे.

No comments:

Post a comment