तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 27 May 2020

मंगरुळपीर येथील भाजपा नगरसेवक अनिल गावंडे याचा जनहितासाठी राजिनामा?


भ्रष्ट आणी निष्र्कीय मुख्याधिकार्‍यांच्या प्रशासनाला कंटाळुन पद सोडणार

न.प.मध्ये जनहिताला प्राधान्य न देता साधल्या जात आहे स्वहित

मंगरुळपीर(फुलचंद भगत)-येथील नगरपरिषदेमध्ये जनहिताला,शहराच्या विकासाला आणी लोकांच्या समस्या न सोडवता फक्त स्वहित साधुन कमिशन खिशात भरन्याचा प्रकार मुख्याधिकार्‍यांकडुन होत असल्यामुळे जनतेसाठी मी आपल्या नगरसेवक पदाचा त्याग करत आहो असे सांगुन भाजपा नगर सेवक यांनी आपला राजिनामा सबंधित वरिष्ठाकडे दिला असल्याचे कळते.त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी,मुख्याधिकारी,नगराध्यक्षांनाही सोशल मिडियाव्दारे कळवले आहे.
          येथील वार्ड क्रमांक १ मधिल लोकप्रिय असलेले आणी जनतेच्या गळ्यातले ताईत असलेले व नेहमी बहुमताने लोकहितासाठी वार्डवाशीयांचा मतदानरुपी आशीर्वाद घेवुन बहुमताने निवडुन येणारे भाजपाचे नगरसेवक नेहमी लोकहिताला प्राधान्य देवुन तसेच जनतेच्या समस्यावर नेहमी आवाज ऊठवुन न्याय मिळवुन देन्याची भुमिका जोपासणारे भाजपाचे नगरसेवक अनिल गावंडे यांनी लोकहितासाठीच आपले नगरसेवक पद सोडन्याची भुमिका घेतली असल्याने खरोखरच असा नगरसेवक होणे नाही असे गौरवोद्ग्र शहरवाशीयांमधुन निघत आहेत.
        मंगरुळपीरची नगरपरिषद सध्या लोकहित साधणारी नसुन स्वहित साधणारी असल्याचे वारंवार निदर्शनात येत असल्याने शहरवाशीयच नव्हे तर नगरसेवकही सध्या ञस्त झालेले बघावयास मिळत आहेत.शहरवाशीयांच्या मुलभुत समस्येकडे हेतुपुरस्सर डोळेझाक करणार्‍या मुख्याधिकार्‍यांनी तर मनमानीपणाचा कळसच गाठला असुन आॅफिसमध्ये न येता शहर समस्येला प्राधान्य न देता व मी म्हणेल तोच कायदा अशा अविर्भावात वागत असल्याचे नगरसेवक अनिल गावंडे यांचे म्हणने आहे.सध्या संपुर्ण देशात कोरोणासारख्या महामारीने हाहाकार माजवला असुन त्यावर प्रशासनाकडुन प्रतिबंधीत ऊपाययोजना करुन तसे नियोजनही सुरु आहे परंतु मंगरुळपीर न.प.मध्ये कोरोनाविषयी कोणतेही गांभीर्य नसुन फक्त कागदोपञीच ऊपाययोजना वरिष्ठांना दाखवुन सर्व आलबेल सुरु असल्याचेही दिसते.मुख्याधिकारी हे कार्यालयात झेंडा टु झेंडाच येत असल्याने मंगरुळपीर शहराच्या विकासाला खिळ बसत आहे.विविध समस्येंनी शहरवाशी ञस्त असल्याने न्याय मागण्यासाठी कार्यालयात येतात परंतु मुख्याधिकारीच हजर नसल्याने रोज तसेच परतावे लागते.आपल्या वार्डातील नगरसेवकांनाही या समस्या शहरवाशी सांगतात त्यामुळे ऊपाययोजना आणी नियोजन करावे यासाठी मुख्याधिकार्‍यांना संपर्क केला असता लोकांमधुन निवडुन आलेल्या लोकप्रतिनिधी नगरसेवकांचेही फोन स्विकारले जात नसल्याने आणी त्यांच्या म्हणन्याकडे हेतुपुरस्सर डोळेझाक केल्या जात असल्याने नगरसेवकही आता वैतागले असल्याचे समजते.जिथे नगरसेवकांनाच नाही तिथे लोकांचा विचार होणार कसा?सध्या शहरामध्ये प्रकर्षाने भेडसावत असलेल्या पाणीप्रश्नाकडेही मुख्याधिकार्‍यांचे दुर्लक्ष असुन काही वार्डातील हातपंपही नादुरुस्त असुन नळाव्दारे पाणीपुरवठाही नियमीत होत नसल्याची शहरवाशीयांची ओरड ऐकावयास मिळत आहे.न.प.हद्दीमध्ये रोडचे डांबरीकरण व खडिकरणाचे कामे सुरु आहेत परंतु सदर कामे ईस्टिमेटनुसार न होता थातुरमातुर सुरु असुन फक्त बिले काढून कमीशन लाटन्याचारी प्रकार सुरु आहे.याला मुख्याधिकार्‍याचीच मुक संमती असल्याची चर्चा शहरात होत असुन अशा बोगस कामाने शहराचा विकास साधता येईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरात बहुतांश ठिकाणी अच्छतता असुन स्वच्छता अभियान फक्त नावालाच ऊरले आहे.रेकार्डवर स्वच्छताविषय कामे दाखवुन बिले माञ काढन्याचा सर्रास प्रकार होत असल्याचेही दिसत असल्याने शहरातील अस्वच्छतेमुळे व दुर्गधीमुळे रोगराईही पसरन्याची शक्यता असल्याने न.प.विषयी लोकांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे.शहरात बहुतांश ठिकाणी लाईट नसुन जिथे लाइट आहेत ते दिवसाच सुरु असतात त्यामुळे बिले माञ शहरवाशीयांच्या करातुन भरल्या जातात त्यामुळे लोकांच्या व शासनाच्या पैशाची ऊधळपट्टीच सुरु असल्याचा प्रकार राजरोसपणे सुरु दिसत आहे.सबंधित मुख्याधिकार्‍यांची प्रशासनातील पुर्वपार्श्वभुमीही वादग्रस्तच असल्याचे दबक्या आवाजात बोलल्या जात असल्याने फक्त ठेकेदाराकडुन टक्केवारी आणी कमीशन लाटणार्‍या या अधिकार्‍यांची खातेनिहाय चौकशीही व्हावी अशी मागणीही गावंडे यांनी केली आहे. प्राप्ती काॅम्प्लेक्समधील गैरप्रकार,पाणीसमस्येकडे दुर्लक्ष,शहरात सुरु असलेले बोगस कामे,स्वच्छतेचा बोजबारा,अधिकार्‍यांची कमीशनखोर वृत्ती,नागरीकांच्याच नव्हे तर नगरसेवकांच्या म्हणन्याकडे दुर्लक्ष,कुणालाही विश्वासात न घेता मुख्याधिकार्‍यांचा मनमानिपना आदी कारणामुळे नगरसेवक पदाचा राजीनामा देत असल्याचे भाजपा नगरसेवक अनिल गावंडे यांनी सांगीतले असुन याविषयी त्यांनी जिल्हाधिकारी,न.प.अध्यक्ष,मुख्याधिकारी यांनाही कळवले असल्याचे समजते.लोकहितासाठी सदैव झटणार्‍या अनिल गावंडे यांचा राजीनामा सबंधित प्रशासन मंजुर करतील का?आणी शहरविकासाला खिळ घालनार्‍या अधिकार्‍यांची खातेनिहाय चौकशी करतील का?याकडे जिल्हावाशीयांचे लक्ष लागले आहे.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.9763007835/8459273206

No comments:

Post a comment