तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 30 May 2020

रायगड जिल्ह्यातील कुटुंबाला मेहकर शिवसेनेचा मदतीचा हात
रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील एका चालकाचा मेहकर पोलीस स्टेशन हद्दीत अचानक मृत्यू झाल्याने गोंधळलेल्या  मेढी कुटुंबाला मेहकर शिवसेनेने सहकार्य करून मृतदेह कर्जतला पाठविण्याची व्यवस्था केली याबाबत मेहकर न.प.उपनगराध्यक्ष शिवसेनेचे जयचंद बाठीया व मृत व्यक्ती चे मोठे बंधू अँड.अजय मेढी यांनी सांगितले की विनीत शिवदास मेढी(वय ४९) रा.कर्जत जि.रायगड हे स्वतःच्या बोलेरो पिक अप ने यवतमाळ येथे आंबे पोहोचवून वापस कर्जत कडे येत असताना जालना मार्गावरील अंजनी जवळील मराठा ढाबा समोर दि २८ ला अंदाजे २ते ३ वाजे दरम्यान चालक विनीत यांनी साईडला गाडी घेतली व काही कळायच्या आत स्टेअरिंगवरच विनीतचा प्राण गेला. या घटनेनंतर सर्वत्र ही बातमी पसरली व मेहकर पो.स्टे.चे उपनिरीक्षक प्रदीप घटे हे कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आरोग्य यंत्रनेला बोलावण्यासाठी खूप काँल केले. अखेर रात्री अंदाजे साडे दहाला आरोग्य विभाग तेथे पोहोचला. या दरम्यान मृतकच्या कर्जत येथील परिवाराला सायंकाळी सहाचे दरम्यान ही बातमी समजली व विनीत यांचे मोठे बंधू अँड अजय यांचे मित्र संजय ओसवाल यांनी कर्जत येथून मेहकरचे शिवसेना शहरप्रमुख तथा उपनगराध्यक्ष जयचंद बाठीया यांना काँल करून सहकार्य करण्याची विनंती केली.तसेच या दरम्यान मेढी कुटुंबाचे चिखली येथील नातेवाईक मधुकर कुळकर्णी हे सुध्दा घटनास्थळी पोहोचले. उपनगराध्यक्ष जयचंद बाठीया यांनी रात्री उशिरा सर्व व्यवस्था केली व मेहकर येथून अंँबुलन्स ने मृतदेह रात्री उशिरा कर्जत ला पाठवला.दि २९ ला सकाळी ११ वाजता हा मृतदेहकर्जत ला पोहोचला व नंतर अंत्यसंस्कार झाले. 

शिवसेनेच्या या सहकार्याबद्दल आपण जयचंद बाठीया यांचे ऋणी असल्याच्या भावना अँड.अजयजी मेढी यांनी व्यक्त केल्या.जमील पठाण
8804935111 /8805381333

No comments:

Post a comment