तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 30 June 2020

पञकारांच्या थेट खात्यावर सरकारने आर्थिक मदत द्यावी.. वसंतराव मुंढे.


शांताराम मगर प्रतिनिधि वैजापुर औरंगाबाद

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला पत्रकार हा निस्वार्थीपणे समाजाची सेवा करीत आहे.हे कार्य करीत असतांना पत्रकारांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते तरी देखील पत्रकार हा डोक्यावर टांगती तलवार घेऊन खंबीरपने समाजाच्या हितासाठी लढत असतो.मात्र हे करीत असतांना शासनाच्या कोणत्याही प्रकारच्या योजनेचा लाभ हा पत्रकार किंवा त्याच्या परिवाराला मिळत नाही.यासाठी शासनाने पञकारांच्या परिवाराच्या भविष्यासाठी उपाययोजना करावी असे मत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंढे यांनी (दि३०) मंगळवार रोजी ओरंगाबाद जिल्हा व तालुक्यातील पत्रकार आणि प्रमुख पदाधिकार्याशी वेब पोर्टल सोशल मीडियावरील मिटिंग मध्ये व्यक्त केले.
लॉक डाऊनच्या काळात पत्रकारांच्या परिवाराला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले असून सरकारने याची नैतिक जबाबदारी स्वीकारून शेतकरी, निराधारा प्रमाणे पत्रकारांना देखील त्यांच्या थेट बँक खात्यावर अनुदान रुपये मानधन द्यावे या मागणीसाठी पत्रकार संघ संघर्ष करेल.पत्रकारांनी कुठेही खचून न जाता या संकटावर मोठ्या धैर्याने मात करावी हा काळ निश्चितपणे बदलेल पत्रकारांनी निस्वार्थीपणे काम करावे राज्य मराठी पत्रकार संघ पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
औरंगाबाद जिल्हाध्यक्ष प्रशांत क्षीरसागर शांताराम मगर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तालुकाध्यक्ष यांनी कोरोना महामारीच्या संकट काळात केलेल्या मदतीचा व कार्याचा आढावा स्पष्ट केला.यामध्ये प्रामुख्याने वैजापुर सिल्लोड ,फुलंब्री,सोयगांव तालुक्यात पञकार संघाने मदत केली व पोलीस कर्मचारी तसेच आरोग्य कर्मचारी यांना मास्क आणि सँनीटायझर देऊन उत्तम कामगिरी केली असल्याचे मत व्यक्त करीत वैजापुर तालुक्यात झोपडीतील व लॉकडाऊन काळात पायी चालत निघालेल्या परराज्यातीत गरजुं लोकांना अन्नधान्य व जेवनाची सोय केल्यायबद्दल राज्य कार्यकारिणी कडून या कार्याचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.
बैठकीत पञकार संघटनेच्या संघटनात्मक बांधणी बाबतीत चर्चा करण्यात येवुन महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ मुंबई चे संस्थापक अध्यक्ष तथा राज्य संघटक संजयजी भोकरे यांना राज्यपाल कोट्यातुन विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्त करण्याच्या मागणीचा एकमुखी ठराव घेण्यात आला.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दैनिकासह पत्रकारांच्या बातम्यांवर आक्षेप घेऊन खोटे गुन्हे दाखल केले गेले आहेत.ते दाखल गुन्हे शासनाकडून तातडीने मागे घेण्याचे आदेश देण्यात यावे.याकरिता संघटनेच्या वतीने निवेदन देण्या बाबत चर्चा झाली.
माध्यमांना लघु उद्योगाचा दर्जा द्यावा व त्या माध्यमातून ग्रामीण पत्रकारांना स्वतंत्र व्यवसाय निर्मितीचे दारे खुली होतील, याकरिता राज्य पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. पत्रकारांना विमा कवच मिळविण्यात संघटनेला यश आले आहे.सध्याचा काळ अवघड असला तरी पत्रकारांनी आपली जबाबदारी न विसरता कार्य करावे.राज्यात ज्या ठिकाणी लॉकडाऊन दरम्यान पत्रकारांवर हल्ले झाले व गुन्हे दाखल झाले असे सर्व गुन्हे मागे घेऊन पत्रकारांना न्याय देण्यात यावा. अशी मागणी देखील संघटनेच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याचे मुंडे यांनी सांगितले.
अधिस्वीकृती धारक पञकार बनविण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार.......
महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघ राज्यातील सर्वच पञकारांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे पुर्ण वेळ पत्रकारिता करनार्या पत्रकारास राज्य शासनाची अधिस्वीकृती धारक पञकार बनविण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करुन कांही जाचक अटीना शितीलता देण्यासाठी संघर्ष करु अशी ग्वाही दिली.या बैठकीला मराठवाडा विभागीय संघटक तथा बिड जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी,औरंगाबाद ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रशांत क्षीरसागर,शांताराम मगर,
सोहेल कादरी(सिल्लोड तालुकाध्यक्ष),सुभाष नागरे(फुलंब्री),भरत पगारे(सोयगांव) शेलेद्र खेरमोडे राधाकृष्ण सोनवणे हसन सय्यद दादासाहेब तुपे विलास मस्केअमोल नगरे,विलास नरवडे, रायभान जाधव बशीर पठाण विलास नरवाडे संदीप मोरे बाबासाहेब सोनवणे विवेकानंद बागुल शरद दामोदर प्रशांत चौधर आदींसह जिल्ह्यातील असंख्य पत्रकारांनी सहभाग नोंदवला होता

No comments:

Post a comment