तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 24 June 2020

आठ वर्षीय मुलीवर नात्यातील मुलाकडून अत्याचार


अंबाजोगाई - आठ वर्षीय बालिकेच्या अज्ञानपणाचा फायदा घेत नात्यातीलच अकरावीत शिकणाऱ्या मुलाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या विधिसंघर्षग्रस्त बालकावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पीडित मुलीस त्रास होऊ लागल्यामुळे रुग्णालयात दाखल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली

अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अत्याचार पीडित बालिकेच्या आईन दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पतीसोबत न्यायालयात वाद सुरू असल्याने त्या एक वर्षापासून चार वर्षीय मुलाला घेऊन माहेरी जाऊन राहिल्या आहेत. तर त्यांची आठ वर्षाची व सहा वर्षाची मुलगी पतीसोबत राहत आहेत. बुधवार दिनांक 24 जून रोजी मुलींना भेटण्यासाठी पतीकडे निघालेले असतात रस्त्यात त्यांना आपली छोटी मुलगी भेटली. तिने मोठ्या बहिणीच्या स्वराचे रुग्णालयात अपेंडिक्स ऑपरेशन असल्याची बातमी आईला सांगितली. त्यामुळे आईने रुग्णालयात जाऊन मुलीची भेट घेतली. आईला पाहताच मुलीला रडू अनावर झाले तसेच तिने आपल्या सोबत घरी नेण्याचा हट्ट जवळ धरला. शंका आल्याने आईने तिला विश्वासात घेऊन चौकशी केली तेव्हा पीडित मुलीने शुक्रवार दिनांक 19 जून रोजी आत्याच्या मुलाने घराच्या वरच्या खोलीत घेऊन मारहाण करत अत्याचार केल्याचे सांगितले. तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास बरे होणार नाही अशी धमकी देखील दिली. त्यानंतर त्रास होऊ लागल्याने पीडित मुलीने आईला त्रास होत असल्याबद्दल सांगितले. त्यामुळे
आजीने तिला स्वराचे रुग्णालयात दाखल केले. बुधवारी आई भेटल्या नंतरच या घटनेचा उलगडा झाला व याप्रकरणी
पीडितेच्या आईने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून विधी संघर्षग्रस्त बालकावर बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सविता शिंगाडे करत असून पोलिसांनी विधिसंघर्षग्रस्त बालकास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

No comments:

Post a comment