तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 28 June 2020

परळीतील काकडे मेडिकल स्टोअर्सचे संचालक जानकीराम काकडे यांना कोरोना योध्दा म्हणून गौरव


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक दायित्व निभावून कार्य करणार्‍या परळीतील काकडे मेडिकल स्टोअर्सचा सामाजिक बांधिलकी जपत चांगल्या प्रकारे सेवा दिल्याबद्दल राधा मोहन प्रतिष्ठान,  दै.मराठवाडा साथी व गती मल्टीसव्हीर्ससकडुन "कोरोना योध्दा'म्हणून सन्मानपञ देवुन जानकीराम काकडे यांचा सचिन भांडे व संतोष मैड यांचे हस्ते वितरीत करन्यात आले.
           कोरोना संक्रमन आजाराने सर्वञ थैमान घातले असुन जनजीवनही विष्कळीत झाले आहे. देशात कोरोना आजाराचा झपाट्याने फैलाव होत असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे.या आजाराला आळा घालण्यासाठी पोलिस ,डाॅक्टर्स, परिचारिका, सफाई कामगार व विविध विभागांचे अधिकारी जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत. तसेच तालुक्यातील अत्यावश्यक सेवेतील मेडिकल स्टोअर्स फार्मसी यांचे ही यामध्ये महत्त्वाचे योगदान देत आहेत. काकडे  मेडिकल स्टोअर्स , स्टेशन रोड परळी वैजनाथ या मेडिकल फार्मचे संचालक जानकीराम काकडे  यांनी मागील तीन महिन्यापासून कोरोनाच्या लढाईत योगदान देत चोवीस तास रूग्णांना सेवा देऊन आपली भूमिका प्रामाणिकपणे व जबाबदारी पार पाडली आहे. याच उदात्त भावनेतून परळीतील येथील स्वयंसेवी आणी सामाजीक कार्यकर्त्यांचेही कार्य ऊल्लेखनिय आहे.या कार्याची ईतरांनीही प्रेरणा घेणे जरुरीचे आहे.कोरोणाविषयक जनजागृती,विविध माध्यमातुन मदत,प्रशासनाशी समन्वय या बाबींची दखल घेवुन राधा मोहन प्रतिष्ठान, दै.मराठवाडा साथी व गती मल्टीसव्हीर्ससकडुन "कोरोना योध्दा'म्हणून सन्मानपञ देवुन सचिन भांडे व संतोष मैड यांचे हस्ते मेडिकलचे संचालक जनार्धन काकडे देऊन गौरविण्यात आले.

No comments:

Post a comment