तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 24 June 2020

आमदार लोणीकरांन कडून कंपार्टमेंट बल्डिंगच्या कामाची शेलगाव येथे पाहणी


 शेलगाव वाशीयांचे केले कौतुक

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतून एक हजार हेक्टर जमिनीवर कंपार्टमेंट बल्डिंग झाले काम

 परतूर
प्रतिनिधी
 शेलगाव तालुका परतूर येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत शेलगाव येथे 1150 हेक्‍टर शिवारात पैकी 1000 हेक्टर शिवारात कंपार्टमेंट बंल्डिंग चे काम झाले असून या कामाची पाहणी माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी केली.पोकरा योजने अंतर्गत झालेल्या कामाची पाहणी करतांना आमदार लोणीकरांनी शेलगावकरांचे योजना व्यवस्थित पणे राबवली असल्याचे सांगत गावकऱ्यांचे तोंडभरून कौतुक केले.पाणीदार शिवारा साठी या योजनेचा मोठा फायदा शेलगावकरांच्या शेतकऱ्यांना येत्या काळात अनुभवास मिळणार असून यामुळे जमिनीचा पोत सुधारण्या बरोबर पाणी पातळीत वाढ होणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने योजनेला गती देण्याचे काम केले होते. शेलगाव येथील ग्रामपंचायत व शेतकऱ्यांनी पोखरा माध्यमातून गावाला समृद्धीकडे नेण्याचा संकल्प पाहून आपण समाधानी असल्याचे सांगितले पुढे बोलताना ते म्हणाले की खांडवीवाडी तालुका परतुर येथील शेतकऱ्यांनीही 750 हेक्‍टरवर कंपार्टमेंट बंल्डिंग चे कामे केली .या गावांनी आदर्श निर्माण केला असून त्यांनी केलेल्या कामाचा फायदा त्यांना येत्या काळात निश्चितपणे होणार असल्याचे आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले.यावेळी गजानन लिपणे,विक्रांत लिपने,दिनकरराव लिपणे,अमृत लिपने,राजेश लिपणे,रामप्रसाद डुकरे,सय्यद नईम,श्रीमंत थोरात यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a comment