तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 30 June 2020

परळी ते मलकापूर मार्गे मरळवाडी मांडवा रस्ता चिखलमय, रस्ता तात्काळ दुरुस्त करावा-भास्कर गित्ते


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी शहरातून जाणाऱ्या परळी, मलकापूर, मरळवाडी ते.मांडवा रस्त्यावर पावसाच्या पाण्याने खड्डेच खड्डे व माळावरून वाहुन येणाऱ्या पाणी रस्त्यावर उतरून वाहुन. आलेल्या गाळामुळे सर्वत्र चिखलमय झाले आहे. वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी भास्कर गित्ते यांनी केली आहे. 
               परळी, मलकापूर, मरळवाडी ते मांडवा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनधारकांची रहदारी आहे. मलकापूर जवळ डोंगर भाग असल्यामुळे पावस पडला की पाणी रस्त्यावर उतरून सर्वत्र गुडघेइतक्या चिखल होत आहे. तसेच रस्त्यावर साचत असलेले. पाणी यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर दुचाकीवरून जाणाऱ्या वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. दुचाकीला चिखल अडकून बसत आहे. तर काही दुचाकी वरून पडुन जखमी झाले आहेत. मोठ्या प्रमाणात चिखलमय झाल्यामुळे दुचाकीधारक सिलिप होण्याची घटना वाढत आहे. रात्रीच्या वेळी अंधारात तर ह्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. रात्री बेरात्री एखाद्या सिलीप.होऊन पडला तर व.कुणी नाही उचलल्यास मोठा अर्नथ होण्याची शक्यता आहे. परळी, ते मांडवा या रस्त्यावरील दोन्ही बांजूनी नालीचे काम करावे त्यामुळे या रस्त्यावर चिखल होणार नाही. परळी, मलकापूर , मरळवाडी ते मांडवा रस्त्यावर  पावसाच्या पाण्याने खड्डेच खड्डे, वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्यावरून कसरत , लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत आहे. तरी.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करावी अशी मागणी भास्कर बालासाहेब गित्ते यांनी केली आहे.

No comments:

Post a comment