तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 27 June 2020

मंगरुळपीर शहरवाशीयांनो सावधान,आता शहरातही कोरोना एंट्री!न.प.प्रशासनाने योग्य ऊपाययोजना करन्याची गरज

वाशिम(फुलचंद भगत)-आतापर्यत जील्ह्यातील सर्वच तालुक्यात कोरोनाने आपले जाळे पसरले असुन जिल्हावाशी भयभित झाल्याचे चिञ सर्वांनीच अनूभवले परंतु मंगरुळपीर हे सेफ मध्ये असल्याने आतापर्यत नागरीक बिनधास्तपणे वावरत असल्याने आणी न.प.प्रशासनाचीही बेसावध वृत्ती अनूभवाय मिळाली त्यातच आता मंगरुळपीर शहरात कोरोनाने आपले पाय पसरल्याने शहरवाशीयातही खळबळ ऊडाली असुन प्रशासनही सतर्क झाले आहे.
       मंगरुळपीर शहरातील एक व्यक्ती अकोला येथे ऊपचार घेत असतांना अाज दि.२७ जुन रोजी सबंधीतांना कोरोना अहवाल पाॅजिटिव्ह झाल्याचे निष्पन्न झाल्याने न.प.प्रशासनासह पोलिस विभाग,महसुल विभागाने बिलाल नगर परिसर सिल करुन जंतुनाशक फवारणी करुन त्या रुग्नाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेवुन पुढील कारवाई सुरु केली आहे.शहरात आलेल्या कोरोणा विषाणुच्या एंट्रिने शहरवाशी भयभित जरुर झालेत परंतु याआधी जशी सर्वञ गर्दी बघावयास मिळत होती, सुरक्षितता,फिजिकल डिसटंन्सचा फज्जा ऊडालेला जरी बघावयास मिळत होता पण  आतापर्यत शहर सुरक्षित होते.परंतु यापुढे तरी या महामारीचे गांर्भीर्य शहरवाशी आणी प्रशासनाने ओळखुन आवश्यक त्या ऊपाययोजना करणे गरजेचे बनले अाहे,अन्यथा एकानंतर आणखी कोरोनाबाधीतांची संख्या वाढायला वेळ लागणार नाही ही भिती लोकांमधुन व्यक्त होत आहे.संबधित परिसराव्यतीरिक्त अन्य वार्डामध्येही जंतुनाशक फवारणी,घरोघरी लोकांची तपासणी,बाहेरुन आलेल्यांची आणी जाणारांच्या नोंदीची काटेकोर माहीती ठेवुन त्यासंदर्भात आवश्यक त्या ऊपाययोजना आतातरी नगरपरिषदेने कराव्यात अशी मागणी होत आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206
     9763007835

No comments:

Post a comment