तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 25 June 2020

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास व धुम्रपानास प्रतिबंध


दोषींवर कायदेशीर कारवाई

बुलडाणा, दि.25 :

साथरोग अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदींच्या अधिन राहून कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास, थुंकण्यास व ई सिगारेटसह धुम्रपानास प्रतिबंध करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान व थुंकण्यामुळे सार्वजनिक मालमत्ता विद्रुप होते व नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. तसेच यामुळे कर्करोग, पुनरूत्पादन संस्थेचे आजार, पचन संस्थेचे आजार, क्षयरोग, न्युमोनिया यांसारख्या प्राणघातक आजारांचा फैलाव होतो. आता तर कोविड महामारीचा संसर्ग हा थुंकीच्या माध्यमातून होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व धुम्रपान करणे कटाक्षाने टाळावे.
   तरी जिल्ह्यातील सर्व इन्सीडेंटर कमांडर, सर्व नायब तहसिलदार, सर्व नगर पालिका, नगर पंचायत चे मुख्याधिकारी, सर्व पोलीस उपनिरीक्षक व सर्व पोलीस अधिकारी, सर्व कार्यालयांचे कार्यालय प्रमुख यांना दंडनीय कारवाई करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांनी घोषीत केले आहे. कुणीही सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व धुम्रपान करताना आढळल्यास त्याविरूद्ध कायदेशीर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेशान्वये कळविले आहे.
                                                                असा आहे दंड

मुंबई पोलीस अधीनियम, 1951 चे कलम 116 नुसार दंड : पहिला गुन्हा केल्यास 1000 रूपये दंड व 1 दिवस सार्वजनिक सेवा, दुसरा गुन्हा केल्यास 3000 रूपये दंड व 3 दिवस सार्वजनिक सेवा, तिसरा व त्यानंतर गुन्हा केल्यास 5000 रूपये दंड व 5 दिवस सार्वजनिक सेवा. भारतीय दंडसंहीता 1860 चे कलम 268,270,272 व 278 नुसार दंड : कलम 268 नुसार दंड, कलम 269 नुसार 6 महिने शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही, कलम 270 नुसार 2 वर्ष शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही, कलम 272 नुसार 6 महिने शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही, कलम 278 नुसार 500 रूपयापर्यंत दंड. सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहीरात प्रतिबंध, व्यापार विनियमन आणि वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वितरण) कायदा 2003 नुसार दंड : कलम 4 अन्वये 200 रूपयापर्यंत दंड, कलम 5 अन्वये पहिला गुन्हा 1000 रूपये दंड किंवा 2 वर्ष शिक्षा किंवा दोन्ही, दुसरा गुन्हा 5000 रूपयापर्यंत दंड किंवा 5 वर्ष शिक्षा किंवा दोन्ही, कलम 6 अ, 6 ब अन्वये 200 रूपये दंड, कलम 7 अन्वये उत्पादकाचा पहिला गुन्हा असल्यास 5000 रूपये दंड किंवा दोन वर्ष शिक्षा किंवा दोन्ही, दुसरा गुन्हा असल्यास 10000 रूपये दंड किंवा 5 वर्षाची शिक्षा, विक्रेत्याचा पहिला गुन्हा असल्यास 1000 रूपये पर्यंत दंड किंवा 1 वर्ष शिक्षा, दुसरा गुन्हा असल्यास 3000 रूपयापर्यंत दंड किंवा 2 वर्ष शिक्षा.

No comments:

Post a comment