तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 25 June 2020

परळीत शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट , शेतक-यांना न उगवलेल्या सोयाबीन बियाणांची नुकसान भरपाई द्या- लहुदास तांदळे यांची मागणी


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील वेळेवर पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली. परंतु शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. शेतक-यांना न उगवलेल्या सोयाबीन बियाणांची नुकसान भरपाई द्या अशी मागणी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्याकडे अखिल भारतीय किसान सेलचे तालुकाध्यक्ष लहुदास तांदळे यांनी केली आहे. 
         परळी तालुक्यातील यावर्षी मृग नक्षत्रात पाऊस झाल्यामुळे शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यावर्षी 70 ते 90.टक्के शेतकऱ्यांनी सोयबिनचा पेरा केला. सोयबीनचे बियाणे उगवले नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.  परंतू,बीज उत्पादक कंपन्यांच्या नफेखोरीमुळे व सरकारच्या दुर्लक्षामुळे अतिशय निकृष्ट दर्जाचे सोयाबीन बियाणे बाजारात विक्रीसाठी आले होते.सोयाबीन पे-यापैकी जवळपास 85% टक्के बियाणे हे उगवलेच नाही.सोयाबीन बियाणे हे न उगवल्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे.त्यात खाजगी सावकारांकडून कर्ज घेऊन शेतक-यांनी बियाणे खरेदी केले होते.पण,बियाणे उत्पादक कंपन्यांनी शेतक-यांना फसवले आहे.
         दमदार झालेल्या पावसाचा तसेच शेतक-यांची पेरणीची लगबग पाहून सोयाबीनच्या बनावट बियाणे काही कंपनी व व्यापारी यांनी शेतक-यांच्या माथी मारले असून हे बियाणे पेरल्यानंतरही उगवले नसल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत. ते सोयाबीन उगवले नाही.शेतक-यांचे आर्थिक नुकसान लक्षात घेऊन राज्य सरकारने दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत करावी व तालुक्यातील न उगवलेल्या सोयाबीन बियाणांची शेतक-यांना नुकसान भरपाई देवून बियाणे उत्पादक कंपन्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्याकडे अखिल भारतीय कि.सेलचे अध्यक्ष लहुदास तांदळे यांनी केली आहे.

No comments:

Post a comment