तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 25 June 2020

पाथरीत राकाँच्या महिला अघाडीने आ पडळकरांच्या प्रतिमेला जोड्याने मारुन केले आंदोलन

किरण घुंबरे पाटील
पाथरी:-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्या विरोधात निवडणूक लढल्याचे बक्षीस म्हणून भाजपची आमदारकी मिळवलेले गोपीचंद पडळकर यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. देशाचे दिग्गज नेते, महाराष्ट्राची आन-बाण-शान असलेले खा.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विरोधात केलेले वक्तव्य अतिशय निंदनीय असून त्याविरुद्ध परभणी जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आज पाथरी राष्ट्रवादी भवन येथे आ.गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

या वेळी बोलतांना राकाँ महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते म्हणाल्या की, 
पवार साहेबांचा अवमान राष्ट्रवादी महिला काँग्रेस सहन करणार नाही; गोपीचंद पडळकरांचे मानसिक संतुलन बिघडले आहे.

बारामतीत झालेला दारुण पराभव गोपीचंद पडळकर यांच्या जिव्हारी लागला असल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आणि यातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार यांचे बदल बेताल वक्तव्य केले असावे.  असे त्या म्हणाल्या  महाराष्ट्राच्या विकासा साठी खा.शरदचंद्रजी पवार यांची भुमीका अग्रणी राहीली आहे. पवार साहेबांची राजकीय कारकिर्द जेवढी वर्षे आहे तेवढे पडळकर यांचे वय नाही. त्यामुळे पवार साहेबांवर बोलणे म्हणजे सूर्यावर थुंकल्यासारखे आहे. पवार साहेबांचा अवमान राष्ट्रवादी महिला काँग्रेस सहन करणार नाही. असे ही नखाते म्हणाल्या.

परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ.भावनाताई अनिलराव नखाते यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मिराताई सरोदे, रेणुका साळवे, रेखा मनेरे, सिता घाटुळ यांचे सह महिला पदाधिकारी यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.

No comments:

Post a comment