तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 27 June 2020

दुबार पेरणीचे संकट ओढावलेल्या शेतकऱ्यांनी घाबरू नये- खा.डॉ.प्रितमताई मुंडेजिल्हाधिकारी व कृषी अधिकाऱ्यांना खा.प्रितमताईंनी केल्या सूचना,बुधवार पर्यंत पंचनामे पूर्ण होणार

बीड (प्रतिनिधी) दि.२७ यंदा पर्जन्यमान चांगले असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीसह बियाणे खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली व पेरणी योग्य पाऊस पडल्यामुळे पेरणीची कामे देखील पार पडली.जिल्ह्यातील जवळपास सर्वच मंडळांमध्ये पेरणी झाली आहे.परंतु एका हप्त्याचा कालावधी उलटला तरीही पेरणी केलेले पीक उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमधून येत आहेत.यासंदर्भात खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून दुबार पेरणीचे संकट ओढावलेल्या शेतकऱ्यांनी घाबरू नये असे म्हंटले आहे.

बोगस बियाणांमुळे परळी,अंबाजोगाई व केज तालुक्यासह जिल्ह्यातील काही भागात पीक उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या.याबत तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत खा.प्रितमताई मुंडे यांनी प्रशासनाशी चर्चा केली.तर जिल्ह्यात एकूण एकविसशे तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी चारशे शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत व उर्वरित शेतकऱ्यांचे पंचनामे येत्या बुधवार पर्यंत पूर्ण करण्यात येतील अशी माहिती त्यांना प्रशासनाने दिली.

दरम्यान चौथा शनिवार व नंतर रविवार असल्यामुळे पंचनामे होतील की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.परंतु शेतकऱ्यांनी याबाबत काळजी करू नये.प्रशासनाच्या एकूण अठरा टीम पंचनामे करण्यासाठी कार्यरत असून शनिवार व रविवारी देखील पंचनाम्याची कार्यवाही सुरू राहणार आहे.जिल्हा प्रशासन बुधवार पर्यंत सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यासाठी प्रयत्नशील आहे.शेतकऱ्यांनी घाबरू नये आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशी प्रतिक्रिया खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a comment