तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 25 June 2020

तालुक्यातील अनेक शेतकर्यांना सोयाबीनच्या बोगस बियाण्यांचा फटकापरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्या आठवडय़ात पाऊस पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात सोयाबीन पीकाचे बियाणे आपल्या शेतात पेरले परंतु अनेक शेतकर्यांना बोगस बियाण्यांचा फटका बसल्याने दुबार पेरणी करण्याची वेळ आल्याचे समजते. शेतकऱ्यांचे या  नुकसानीस जबाबदार कोण  हा प्रश्न निर्माण झाला आहे. 
    परळी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीनची पेरणी केली आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरलेली सोयाबीन उगवलेच नाही. त्यामुळे नाईलाजाने त्यांना दुबार पेरणी करावी लागली. 

    दुबार पेरणीमुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याप्रकरणी परळी पंचायत समिती कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी लक्ष  देण्याची गरज आहे.

No comments:

Post a comment