तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 25 June 2020

शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या - कु.प्रेक्षा विजय भांबळेजिंतूर:- जिंतूर-सेलू तालुक्यासह परभणी जिल्ह्यातील  शेतकऱ्यांनी खरीप पिकांमध्ये सोयाबीन पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली असून सोयाबीन पिकाचे बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. 
      जिंतूर-सेलू तालुक्यासह परभणी जिल्ह्यात खरीप पेरणी हि अत्यंत महत्वाची असून शेतकरी मोठ्या प्रमाणात पिकांची पेरणी करतात. त्यात अनेक शेतकरी विविध कर्ज काढून बी-बियाणे खरेदी करतात, त्याचसोबत विविध प्रकारचे खते खरेदी करून पिकांसोबत पेरत असतात. परंतु, जिंतूर-सेलू तालुक्यासह परभणी जिल्ह्यात बहुसंख्य ठिकाणी पेरलेले सोयाबीन बियाणे बोगस असल्याने उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. तसेच सोयाबीन न उगवल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. 
       परंतु, कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकांचे पंचनामे करण्याऐवजी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून पंचनामाकरण्यासाठी आर्ज मागविले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी अतिविलंब होणार आहे. त्यात दुबार पेरणीचा वेळ निघून जाईल व शेतकऱ्यांना अधिकच नुकसान होईल त्यासाठी  शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे सोयाबीन पेरणीचे पंचनामे तत्काळ करून बोगस बियाणे कंपन्यांवर कडक कार्यवाही करावी आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना बोगस बियाणे कंपनीकडून तात्काळ हेक्टरी ५० हजार रु नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली. 
यावेळी जिल्हाधिकारी मुगळीकर साहेबांनी जिल्हा कृषी विभागाचे कर्मचारी  अपुरे पडत असल्यामुळे पेरणीपूर्वी दुसऱ्या विभागाचे कर्मचारी नेमून तात्काळ  पंचनामे करून लगेच नुकसान भरपाई देण्यात येईल असे तोंडी आदेश देण्यात आले.
 यावेळी प्रेक्षा विजयराव भांबळे यांच्यासह जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय चौधरी, समाज कल्याण सभापती रामराव उबाळे, जिंतूर पं.स.सभापती वंदनाताई ईलग, राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्षा मनिषा केंद्रे इ उपस्थित होते.

No comments:

Post a comment