तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 29 June 2020

परळी तालुक्यातील गाढे पिंपळगाव डॉ.व्यकंटेश कुलकर्णी बजावताहेत सेवा


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
                तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील पहिले एमबीबीएस डॉक्टर व सध्या एम एस सर्जन च्या फायनल वर्षात शिक्षण घेत असतानाच व्यंकटेश सुधाकर कुलकर्णी हे सध्या नांदेड येथील कोवीड विभागात कोरोना यौध्दा म्हणून काम करत आहेत.
                  गेल्या तीन महिन्यांपासून संपूर्ण देशात कोरोना विषाणूचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे अनुभवी डॉक्टरांसह शिकाऊ, तसेच वैद्यकीय शिक्षण सुरु असलेले डॉक्टर यांनाही इमर्जन्सी म्हणून कामे करावी लागत आहेत. कारण महानगरांसह गावापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रभाव वाढत आहे. यामुळे या सर्व वैद्यकीय क्षेत्रातील प्रशिक्षितांना कोरोनाच्या ड्युट्या कराव्या लागत आहेत. गाढे पिंपळगाव येतील पहिले एबीबीएस डॉक्टर आहेत. तसेच ते एम एस सर्जन होत आहेत. डॉ. व्यंकटेश सुधाकर कुलकर्णी पहिली ते चौथीचे प्राथमिक शिक्षण खोलेश्वर विद्यालय अंबाजोगाई येथे पाचवी ते दहावी योगेश्वरी विद्यालय,अकरावी ते बारावी योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई तर एमबीबीएसचे शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ( घाटी) औरंगाबाद व
एम एस सर्जन डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्याल नांदेड येथे शेवटच्या वर्षाचे शिक्षण चालू आहे. असे असताना इमर्जन्सी म्हणून त्यांना नांदेड येथे कोवीड कक्षात डिट्युटी सुरू आहे. डॉ. व्यंकटेश कुलकर्णी खऱ्या अर्थाने कोरोना यौध्दा म्हणून काम करत असल्याचे समाधान गावकऱ्यां मध्ये आहे.

No comments:

Post a comment