तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 27 June 2020

मंगरुळपीर येथे संभाजी ब्रिगेडच्या तालुकास्तरीय समितीचे गठनमंगरुळपीर- मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेड च्या तालुका स्तरीय कमिटीचे गठन करण्यासाठी सर्किट हाऊस मंगरूळपिर येथे सभेचे आयोजन जिल्हाध्यक्ष गजानन भोयर यांचे अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात होते.या सभेमध्ये  समिती गठन करण्यात आली.तालुका अध्यक्ष गणेश चिपडे,ऊपाध्यक्ष जय गवारगुरु,सचिव,निचळ,,साहित्य कक्ष च्या तालुका अध्यक्षतेपदी गणेश वानखडे याची निवड करण्यात आली. यावेळी 35 युवकांनी संभाजी ब्रिगेड मध्ये जाहीर प्रवेश केला त्यांचे स्वागत गजानन भोयर यांनी केले, उर्वरित कार्यकारणी लवकर गठन करण्याच्या सूचना त्यांनी नवीन कार्यकारणी ला केल्या.यावेळी प्रा जाधव सर, बेनिवाले, नितेश पोहोकार यांची समयोचित मार्गदर्शन केले. सभेला संभाजी ब्रिगेडचे जिल्हा ऊपाध्यक्ष गणेश गावंडे,रमेश मुंजे,राजेश दबडे,पत्रकार फुलचंद भगत,बाळासाहेब मांढरे शहरप्रमुख संभाजी ब्रिगेड यांची उपस्थिती लाभली.प्रास्ताविक गणेश चिपडे यांनी तर  सूत्रसंचालन तथा आभारप्रदर्शन मराठा सेवासंघाचे शहर अध्यक्ष सुरेश गावंडे यांनी केले, सभेला मोठ्या प्रमाणात तरुण मंडळी उपस्थित होते.शासकिय नियमांचे पालन करुन आणि फिजिकल डिसटंन्स ठेवुन ही सभा घेन्यात आली.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835
     8459273206

No comments:

Post a comment