तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 29 June 2020

गँस सबसिडीपासून ग्राहक वंचित, परळी शहरात सबसिडी देण्याबाबत होतेय टाळाटाळ


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
           येथील वैद्यनाथ गँस एजन्सी अंतर्गत येणाऱ्या अनेक ग्राहक सबसिडी पासून वंचित आहेत. गँस एजन्सी चालक व बँक सबसिडी संदर्भात टोलवाटोलवी करताना दिसून येत आहेत.
             केंद्र सरकारच्या नियमानुसार गँस ग्राहकांना आधार कार्ड लिंक केल्यास गँसची सबसिडी ग्राहकांच्या थेट खात्यात जमा होते. ही प्रक्रिया सुरू होवून अनेक वर्षे झाली आहेत. पण आणखीनही येथील अनेक ग्राहकांच्या खात्यात ही सबसिडी जमा होत नाही. गँस आँफीसला चौकशी केली की, ते बँकेकडे बोट दाखवतात. बँकेत विचारले की, बँकेवाले गँस एजन्सी कडे जाण्यासाठी सांगतात. संबधीत गँस एजन्सी मध्ये जाऊन सबसिडी संदर्भात चौकशी केली तर तुमचे बँक खाते आधार कार्ड शी लिंक झाले नसेल तुम्ही अगोदर बँक खाते आधारकार्डशी बँक खाते लिंक करून घेण्यास सांगितले जाते. यासंदर्भात बँकेत चौकशी केली आधार कार्ड लिंकचा अर्ज दिला की, बँकेचे कर्मचारी तुमचे आधारकार्ड खात्यास लिंक आहे असे सांगितले जाते.  सबसिडी संदर्भातील सर्व प्रक्रिया नियमानुसार केलेली असताना अनेक ग्राहकांची सबसिडी मात्र जमा होत नाही. गँसच्या ग्राहकांचे आर्थिक नुकसान होत आहे. या संदर्भात आता तक्रार तरी कोणाकडे करायची असा प्रश्न हे ग्राहक विचारत आहेत. या ग्राहकांची होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्याची मागणी या ग्राहकांनी केली आहे. तसेच आजपर्यंत झालेल्या नुकसानीबदल वैद्यनाथ गँस एजन्सी वर ,बँक कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.

No comments:

Post a comment