तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 29 June 2020

परळीच्या नेहा जगतकर ची तेलंगणा भरारीपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  तेलंगाना स्टेट बोर्ड येथील एस.एफ.एस. हायस्कूल. शांतीनगर हैदराबाद, परळीच्या कु. नेहा बालाजी जगतकर राहणार जगतकर गल्ली,परळी जिल्हा बीड. हिने 10 पैकी 9.5 गुण घेऊन म्हणजेच (10/9.5) CGPA घवघवीत यश मिळविले आहे, एस.एफ. एस. हायस्कूल मधून गुणवंत म्हणून बहुमान प्राप्त केला आहे. कु. नेहा बालाजी जगतकर हिने  परळीचे नाव हैदराबाद तेलंगणा राज्यात नावलौकिक केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे, परळी व बीड येथील रहिवासी असलेले संपादक पत्रकार बालाजी जगतकर व तुलसी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य उमा जगतकर यांची कन्या आहेत, कु. नेहा हिने  तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील शांतीनगर एस.एफ.एस. हायस्कूल येथे इयत्ता दहावीत शिक्षण घेत होती. तिने या परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत परळीचे नावलौकिक केले आहे. 10 पैकी 9.5 पैकी म्हणजेच (10/9.5) CGPA गुण घेऊन यश संपादन केले आहे. तिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a comment