तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 25 June 2020

परळीत गजानन महाराज मंदिर समोरून दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीस परळी पोलिसांकडून जेरबंद


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-.परळी शहरातील श्री. गजानन महाराज मंदिर समोरून मोटार सायकलचे हँन्डलाँक तोडून लंपास केल्याची घटना घडली होती. परळी पोलिसांनी या घटनेचा तपास करून आरोपीस अटक करून आरोपीकडुन मोटारसायकल व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 
     याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, परळी शहरातील गजानन महाराज मंदिर परिसरातील  उत्तम वसंतराव जोशी रा.हरंगुळ, ता.गंगाखेड, जि.परभणी ह.मु.गजानन महाराज मंदिर विद्यानगर, परळी वैजनाथ यांची फँशन प्रो मोटारसायकल दि.21 जून रोजी रात्री 7 ते दि.22 जुन रोजी 4 .30 च्या सुमारास चोरी झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी दि.24 जुन रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पोलिसांनी सिसिटीव्ह फुटेजच्या आधारे आरोपीची माहिती मिळाली. तो आरोपी परभणी जिल्ह्यातील झरी, बोरी येथे असल्याचे सूत्रांकडून कळाले तेव्हा आरोपी मंगलसिंग हिरासिंग बावरी, रा.शिवाजी चौक, परळी वैजनाथ यांना परळी पोलीस ठाण्याचे डीबी पथकातील बांगर, केंद्रे, भताने, सुर्यवंशी यांनी जाऊन आरोपीकडुन मोटारसायकल व मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी परळी न्यायालयात पीसीआर साठी आरोपीला हजर करणार असल्याचे समजते. या आरोपी किती गुन्हे दाखल आहेत. किती घरफोड्या केल्या आहेत. ते पुढील तपास समजू शकेल हे समजले नाही. परळी शहरातील घरफोड्या व मोटारसायकल चोरी प्रकरणातील आरोपींच्या दोन दिवसापूर्वी पोलीसांनी मुसक्या आवळल्या होत्या. पोलिसांनी केलेल्या कामगिरीबद्दल कौतुक होत आहे.

No comments:

Post a comment