तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 27 June 2020

मानसं मेल्यावर ग्रामपंचायत कारवाई करणार का?सोनखासवाशी संतप्त!पांदनरस्ता खुला करुन देन्याची सोनखासवाशीयांची मागणी


मंगरुळपीर- येथील सोनखास परिसरातल्या विठ्ठलरुख्मिनी मंदिराकडे जाणारा पुर्वेकडचा रस्ता बंद करून गटारीचे पाणी अडविन्यात आल्याने परिसरातील नागरीकांना मोठा ञास सहन करावा लागतोय तसेच त्याठिकाणी रोगराई पसरन्याची भिती असुनही प्रशासन हेतुपुरस्सर कारवाई करन्यात टाळाटाळ करीत असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे.
          नविन सोनखास येथे असलेल्या विठ्ठल रुख्मीनी मंदिराकडे जाणारा पुर्वेकडचा रस्ता बंद केला असुन त्यामुळे बायपास मार्गे जाणारे गटारीचे पाणीही थांबले आहे.सोसायटीमधील नागरीकांना शहापुर ते सोनखास जान्यासाठी ३३ फुटाचा पांदन रस्ता आहे परंतु तेथे काहींनी अतिक्रमण केल्याने सदर रस्ता बंद आहे.रस्ता अडवुन गटार निर्माण करणारा व्यक्ती धनदांडगा असल्याने प्रशासनही अनेकवेळा तक्रारी करुनही काही कारवाई करत नसल्याचा आरोपही तेथिल नागरीकांनी केला आहे.परिसरात मोठी गटार साचल्याने आणी सध्या पावसाळा असल्याने त्या गटारीव्दारे येनारे पाणी नागरीकांच्या घरात घुसत आहे.परिसरात दुर्गंधी सुटल्याने रोगराइचा प्रश्नही ऊद्भवत आहे.तुबलेल्या गटारीमुळे रोगराई पसरुन जिवितहानी झाल्यावर प्रशासन कारवाई करेल का?असा संतप्त सवाल तेथील नागरीकांनी विचारला असुन मागणीची तात्काळ दखल न घेतल्यास ऊपोषणाचा इशाराही देन्यात आला आहे.

फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206
     9763007835

No comments:

Post a comment