तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 27 June 2020

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शाखा व्यवस्थापक यांचा सत्कारडोणगांव :- 26
येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा डोणगांव चे व्यवस्थापक यांनी शेतकरी व ग्राहकांची कामे वेळेवर केल्याबद्दल सन्मान करण्यात आला मेहकर सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतकरी वर्ग पिक कर्ज घेण्यासाठी विविध राष्ट्रीयकृत बँकेमध्ये धावपळ करीत आहे सर्वसामान्य ग्राहक सुद्धा आपल्या व्यवसायाच्या कामासाठी विविध बँकेमध्ये आर्थिक व्यवहाराची देवाण-घेवाण करीत आहे अशा परिस्थितीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा डोणगाव चे व्यवस्थापक अमूल  नाफडे यांनी शेतकऱ्यांना व संबंधित बँकेच्या ग्राहकांना वेळेवर कर्जपुरवठा केला आहे याचबरोबर बँकेमध्ये येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची व ग्राहकांची बँके संबंधित येणाऱ्या अडचणी दूर केल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मेहकर तालुकाध्यक्ष पंकज पळसकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा डोणगाव चे व्यवस्थापक अमूल  नाफडे यांचा चांगल्या व उत्कृष्ट कामाबद्दल सत्कार केला सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने पेरणी साठी खते व बी बियाणे खरेदीसाठी शेतकरी विविध बँकेकडे पिक कर्ज घेण्यासाठी धावपळ करीत आहेत अशा परिस्थितीमध्ये डोणगाव येथील स्टेट बँक अॉफ इंडिया चे शाखा व्यवस्थापक अमूल नाफडे यांनी शेतकऱ्यांची अडचण व बँकेच्या संबंधित ग्राहकांची अडचण लक्षात घेऊन वेळेवर कर्ज पुरवठा केलेला आहे शाखा व्यवस्थापक अमूल नाफडे यांनी केलेल्या कार्याबद्दल शेतकरी  राहुल राजेश आखाडे  व  जगन भाऊराव पळसकर  यांनी  व इतर मान्यवरांनी शाखा व्यवस्थापक अमूल नाफडे सत्कार करण्यात आला  तसेच या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मेहकर तालुका अध्यक्ष पंकज भाऊ पळसकर यांच्यासह  चरण आखाडे यांनी गुलाब पुष्प देऊन शाखा व्यवस्थापक अमोल नाफडे यांचा सत्कार केला यावेळी माजी प स सदस्य प्रकाश पळसकर, रवी वाघटकर, सुशील गवई ,अनंत आखाडे, ओम भालेराव, अश्विन चव्हाण ,जीवन बाजड ,अक्षय संघवई ,ओम सुर्वे ,दिपक खरात, गजानन आढाव ,पप्पू आखाडे ,गणेश आढाव ,राहुल आखाडे, विजय साळवे, जगन पळसकर ,प्रशांत पिंपरकर, गणेश लहाने ,शैलेश नंदेवार, अजय पेटकर यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचेसह  शेतकरी बांधव व बँके संबंधित ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते


जमील पठाण
8804935111 /8805381333

No comments:

Post a comment