तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 27 June 2020

साठ वर्षात प्रथमच राज्याच्या गृहमंत्र्यांची फॉरेन्सिक लँबला भेट


गुन्हे सिद्ध होण्यास लँबचे कार्य  महत्त्वपूर्ण व कौतुकास्पद


-गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई दि.२७- पुणे येथील प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेला (फॉरेन्सिक लँबला) गेल्या साठ वर्षांत प्रथमच राज्याच्या गृहमंत्र्यांनी भेट दिली असून गुन्हे सिद्ध होण्याच्या संदर्भात या लँबचे काम खूप महत्त्वपूर्ण व कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेटीदरम्यान काढले.
     गृहमंत्र्यांनी काल दि. २६ रोजी या प्रयोगशाळेस भेट देऊन तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली. तसेच त्यांच्या कामाची पद्धत, अडीअडचणी याबद्दल माहिती घेतली. 
     या वेळी प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोशाळा पुणेचे उपसंचालक राजेंद्र कोकरे,यांनी गृहमंत्र्यांच्या स्वागत करून  या प्रयोगशाळेत होत असलेल्या विविध कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. यात प्रामुख्याने  संगणक गुन्हे,  ध्वनी व ध्वनीफीत  विश्लेषण, जीवशास्त्र, डीएनए, विषशास्त्र, सामान्य विश्लेषण व उपकरणे, आणि दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागामध्ये करण्यात येणाऱ्या कामकाजाची सविस्तर माहिती देण्यात आली.
      गृहमंत्र्यांचे सोबत झालेल्या चर्चेत सहाय्यक संचालक श्रीमती धर्मशिला सिन्हा, निलिमा बक्षी, सोनाली फुलमाळी, वैशाली शिंदे, अंजली बडदे, श्री महेंद्र जावळे आदींनी सहभाग घेतला.
......................................

No comments:

Post a comment