तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 28 June 2020

कोरोनाच्या संकट काळात उत्कृष्ट सेवेबद्दल पोलिस शिपाई संजय गित्ते यांना कोरोना योध्दा पुरस्कारांने गौरव
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- येथील राधा मोहन प्रतिष्ठान,  दै.मराठवाडा साथी व गती मल्टीसव्हीर्ससच्यावतीने
कोरोनाच्या संकटात जिवाची पर्वा न करता आपले योगदान दिले. कोरोनाच्या संकटात परळी तालुक्यातील नंदागौळचे भूमिपुत्र संजय गित्ते यांनी मुंबईच्या ठिकाणी कोरोनाच्या विळख्यात पोलिस प्रशासंनातील लढाईत उत्कृष्टपणे सेवा बजावल्याबद्दल त्यांचा कोरोना योध्दा पुरस्कार प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे. 
          कोरोना सारख्या महाभयंकर अशा महामारीत संपूर्ण जग हादरले आहे. अशाही कठीण परिस्थितीत आपल्या देशातील जनतेला कोरोनापासून वाचविण्यासाठी सरकार आहोरात्र प्रयत्न करीत आहेत. यामध्ये विशेष करून पोलिस व वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी कोरोना योध्दा म्हणून लढत आहेत. सध्या मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाने विळखा घातला आहे. राज्यातील सर्वाधिक रूग्ण मुंबई येथे आहेत. मुंबई पोलीस शिपाई म्हणून संजय गित्ते यांनी आगोदर भारतीय सैन्य दलात आपले कर्तव्य बजावले आहे. सेवानिवृत्ती मिळाल्यानंतर त्यांनी गेल्या 7 वर्षापासून पोलिस दलात कार्यरत आहेत. ते मुंबई येथील मरोळ पोलीस हेडकाँटर
मुंबई पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई म्हणून रूजू आहेत. त्यांना कामावर असतांना राज्यातील अनेक पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना कोरोनाची बाधा झाली. अनेकांचा बळी देखील गेला. पोलिसांना सर्वाधिक कोरोनाची बाधा मुंबईत झाली आहे. अशा कठीण परिस्थितीत परळी तालुक्यातील नंदागौळचे भूमिपुत्र कोरोनाच्या विरोधात फाईटर म्हणून लढत आहेत. दररोज कल्याण ते मुंबई आप डाऊन 130 KM  जाने येणे करून कोरोनाच्या संकटकाळात गेल्या तीन महीन्या पासून सुरक्षकवच वापर करून आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांनी कोरोनाच्या संकटात जिवाची पर्वा न करता आपले योगदान दिले . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजासाठी व आरोग्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहोरात्र केलेल्या कार्याबद्दल संजय बाबुराव गित्ते (माजी सैनिक) यांना राधा मोहन प्रतिष्ठान,  दै.मराठवाडा साथी व गती मल्टीसव्हीर्ससच्या वतीने कोरोना योध्दा'म्हणून सन्मानपञ देवुन मराठवाडा साथीचे संपादक चंदुलाल बियाणी, संचालक सचिन भांडे, संतोष मैड यांच्या हस्ते वितरीत करन्यात आले. पोलीस प्रशासनातील सेवाबजावल्याबद्दल पोलीस शिपाई संजय गित्ते कोरोना यौध्दा म्हणून सन्मानित करण्यात आल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a comment