तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 28 June 2020

जय भगवान महासंघाच्या परळी तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब फड यांची निवड
परळी वैजनाथ दि.27 (प्रतिनिधी) :-
              शहरातील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब अंकुशराव फड यांची जय भगवान महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी शनिवारी (ता.२७) नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
                  येथील मंगल कार्यालयात जय भगवान महासंघाच्या बैठकीचे आयोजन शनिवारी (ता.२७) करण्यात आले होते. या बैठकीस जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप, मराठवाडा अध्यक्ष सचिन डोईफोडे, योगेश खाडे, बीड जिल्हा अध्यक्ष बाप्पासाहेब घुगे आदिंच्या प्रमुख उपस्थितीत तालुकाध्यक्षपदी येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब अंकुश फड यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी बाळासाहेब सानप यांनी नियुक्तीचे पत्र प्रदान केले. मान्यवरांच्या हस्ते नुतन तालुकाध्यक्ष बाळासाहेब फड यांचा सत्कार करण्यात आला.निवडी बदल बोलताना श्री.फड यांनी सांगितले की, भगवान महासंघाचे ध्येय, धोरण तालुक्यात सर्वत्र पोहचवून संघटना वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. बैठकीस जय भगवान महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.या निवडी बद्दल श्री.फड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a comment