तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 28 June 2020

शहरवाशीयांनो सावधान,आता कोरोना शहरात पाय पसरत आहे !प्रशासनाने योग्य ऊपाययोजना करन्याची गरज. 

डोणगांव :- आतापर्यत जील्ह्यातील सर्वच तालुक्यात कोरोनाने आपले जाळे पसरले असुन जिल्हावाशी भयभित झाल्याचे चिञ सर्वांनीच अनूभवले परंतु मेहकर तालुका हे सेफ मध्ये असल्याने आतापर्यत नागरीक बिनधास्तपणे वावरत असल्याने आणी प्रशासनाचीही बेसावध वृत्ती अनूभवाय मिळाली त्यातच आता डोणगांव शहरात कोरोनाने आपले पाय पसरल्याने शहरवाशीयातही खळबळ ऊडाली असुन प्रशासनही सतर्क झाले आहे.
       काही दिवसा पुर्वी औरंगाबाद ते रिसोड मार्गे डोणगांव मध्ये कोरोनाचे संक्रमन पोहोचले असून रिसोड येथील कोरोना ग्रस्त रूग्णांची पत्नी ही डोणगांव येथे आली होती व ती महीला सुध्दा पाॅझीटिव्ह निघाल्याने 13 जुन ला बुलढाण्यातील कोवीड रुग्णालयात हलविण्यात आले त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली व या वेळी काही दिवस प्रशासकीय यंत्रणा सुध्दा जागी झाली परंतु लगेच तिन दिवसांनी जैसे थे हि भुमिका प्रशासनाने घेतली. लगेच बाहेर देशातुन एक विद्यार्थी काही दिवसा पुर्वी डोणगांव येथे आला परंतु त्याला मेहकर येथील एक हाॅटेल मध्ये कोरनटाईन करण्यात आले होते परंतु अाज दि.२७ जुन रोजी सबंधीतांना कोरोना अहवाल पाॅजिटिव्ह झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्या मुळे पुन्हा प्रशासनासह पोलिस विभाग,महसुल विभागाला जाग आली व त्या रुग्नाच्या संपर्कातील व्यक्तींना शोध घेवुन पुढील कारवाई सुरु केली आहे.शहरात आलेल्या कोरोणा विषाणुच्या एंट्रिने शहरवाशी भयभित  झाले परंतु याआधी जशी सर्वञ गर्दी बघावयास मिळत होती, सुरक्षितता,फिजिकल डिसटंन्सचा फज्जा ऊडालेला जरी बघावयास मिळत आहे पण  आतापर्यत शहर सुरक्षित होते.परंतु यापुढे तरी या महामारीचे गांर्भीर्य शहरवाशी आणी प्रशासनाने ओळखुन आवश्यक त्या ऊपाययोजना करणे गरजेचे बनले अाहे,  डोणगांव हे मोठी बाजारपेठ आहे त्यामुळे या ठिकाणी परीसरातील लोक जिवन आवश्यक वस्तू खरेदी करण्या साठी येतात परंतु येथील व्यापारी वर्ग मात्र कोनतीच काळजी घेत नसल्याचे दिसून येते काही ठिकाणी लोक गोळक्याने उभे राहतात तर काही मास्क न लावता बाजारात फिरताना दिसतात तर उपहारगृह सुरू झाल्याने त्या ठिकाणी सुध्दा लोकांची गर्दी जमु लागली आहे. हा सर्व प्रकार कोवीड दक्षता समिती समोर सुरू आहे तरी सुद्धा या कडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे जेंव्हा दक्षता समितीच या कडे लक्ष देत नाही तर पोलीस विभागालाही काय घेने देने आहे. परंतु या हलगर्जीपणामुळे डोणगांव मध्ये  दोन नंतर आणखी कोरोनाबाधीतांची संख्या वाढायला वेळ लागणार नाही ही भिती सुज्ञ लोकांमधुन व्यक्त होत आहे.संबधित परिसराव्यतीरिक्त अन्य वार्डामध्येही जंतुनाशक फवारणी,घरोघरी लोकांची तपासणी,बाहेरुन आलेल्यांची आणी जाणारांच्या नोंदीची काटेकोर माहीती ठेवुन त्यासंदर्भात आवश्यक त्या ऊपाययोजना आतातरी प्रशासनाने कराव्यात अशी मागणी होत आहे.


जमील पठाण
8804935111 /8805381333

No comments:

Post a comment