तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 1 June 2020

पाथरी तालुक्यात सर्वदुर मान्सून पुर्व पाऊस.किरण घुंबरे पाटील

पाथरी:-गेली पाच सात वर्षा पासून निसर्गाच्या कोपात नागावलेला शेतक-याला रविवारी सायंकाळी तालुक्यात तीनही मंडळात सर्वदूर पडलेल्या मॉन्सून पुर्व पावसाने सकारात्मक संदेश दिल्याने काहिसा दिलासा मिळाला असला तरी यात सातत्य रहावे ही सामान्य गरीब शेतक-याची अपेक्षा आहे.

कोरोना महामारीमुळे संपूर्ण भारतात मार्च महिन्यात अभूतपूर्व संचारबंदी लागू केली गेली. महामारीला घाबरून लहान-मोठी, गरीब -श्रीमंत सगळी माणसे स्वत:ला घरात कोंडून घेऊन बसली. उद्योगधंदे, व्यवसाय बंद पडले; नोकऱ्या गेल्या;  रोजगार बुडाले. महामारीची सर्वात मोठी कुऱ्हाड कोसळली ती हातावर पोट असणाऱ्या रोजंदारी करणाऱ्या मजुरांवर, हातगाडीवाल्यांवर, पथारीवाल्यांवर आणि दुकानात काम करणाऱ्या गड्यांवर!  संचारबंदी वाढवावी लागली तसे महामारीच्या भीतीने आणि पोटासाठी लोक संचारबंदी झुगारून  मूळगावी, मूळ राज्याकडे परतू लागले. रस्त्यांच्या दुतर्फा, लोहमार्गांवर, आडवाटांवर स्थलांतरितांचे थवेच्या थवे दिसू लागले. अशा स्थितीत जगाचा पोशिंदा मात्र त्याच्या वावरात राबराब राबतो आहे. सर्वाना उर्जा देणारे अन्न तो पिकवत आहे. या संकटात त्याचे मोठे नुकसान झाले असले तरी तो इतरांच्या खुशहाली साठी प्रार्थना करतो आहे. त्याचा कापुस,तुर,हरबरा,टरबुज,खरबूज,केळी,संत्रा, मोसंबी आणि इतर पिके जरी कवडीमोल दराने गेली असली तरी तो शेतात राबतोय अशातच ३१ मे रोजी संपुर्ण तालुकाभरात जोरदार पर्जन्य वृष्टी झाली. ही सुखावनारी बाब आहे. या पुढेही अशा पद्धतीने वरुनराजा वेळेवर बरसला तर खरीप हंगामाची सुरूवात मृगात होईल. अशी अपेक्षा जगाचा पोशिंदा ठेवतो आहे. तालुक्यात मागिल काही वर्षात सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान झाले. या वर्षी १जून रोजी तिन्ही मंडळात सरासरी चाळीस मीमी वर पाऊस झाला हे खरीपा साठीचे शुभ संकेत म्हणावे लागतील. ३१ मे रोजी सायंकाळी पाथरी ४५ मी ली. बाभळगाव ४२ मीली. आणि हादगांव ४० मीली अंश सेल्सीयस  पावसाची नोंद झाली. विजांच्या कडकडातात पडलेला मॉन्सून पुर्व पाऊस शेतक-यांना समाधान देणारा तर सर्व सामान्यांना उकाड्या पासून सुटका देणारा ठरला आहे.

No comments:

Post a comment