तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 27 June 2020

निकिता जगतकर आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्या - बाबुराव पोटभरे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- एकतर्फी प्रेमातून सतत च्या छळास कंटाळून शहरातील निकिता जगतकर ने आत्महत्या करून आपले जीवन संपविले. बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी आज मयत निकिताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यास फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी मगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, दत्ता सावंत, अनंत इंगळे, प्रा.डॉ.विनोद जगतकर, फुले आंबेडकरी अभ्यासक इंजि.भगवान साकसमुद्रे, ज्येष्ठ पत्रकार रानबा गायकवाड हेही उपस्थित होते.
         शहरातील भीमनगर (जगतकर गल्ली) येथील निकिता जगतकर या तरुणीने एकतर्फी प्रेमातून पाठलाग करून त्रास देणाऱ्या आरोपी उस्मान शेख याला कंटाळून राहत्या घरात आत्महत्या केली. याप्रकरणी परळी शहर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे व ऍट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आज दि.२७ रोजी बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी मगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी मयत निकिताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले व तातडीने आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले. तसेच संबंधित प्रकरणातील आरोपीस तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणीही केली. आरोपीला अटक करण्यासाठी तातडीने पोलिसांनी पावले उचलावीत यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोदार, उपविभागीय अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्याशी शिष्टमंडळासह चर्चा केली. या वेळी नेते बाबुराव पोटभरे व बाजीराव धर्माधिकारी यांनी पीडितेच्या कुटुंबास राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आर्थिक मदद करणार असल्याचे जाहीर केले.
          यावेळी दत्ता सावंत, अनंत इंगळे, नगरसेवक नितीन रोडे, प्रा.डॉ.विनोद जगतकर, फुले आंबेडकरी अभ्यासक इंजि.भगवान साकसमुद्रे, ज्येष्ठ पत्रकार रानबा गायकवाड, पंचायत समिती सदस्य मुरलीधर साळवे, श्रीहरी मोरे, नगरसेवक नितीन रोडे, राजन वाघमारे, स्वप्नील साळवे, राज जगतकर, अमर रोडे, सिद्धार्थ रोडे, अविनाश वाली, रवी मुळे, रतन अधोडे, अशोक पोटभरे, संकेत दहीवडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a comment