तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 24 June 2020

डॉ. संदीप काळे व गणेश मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबिरपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे टोकवाडी येथील डॉ. संदीपान काळे व युवक कार्यकर्ते गणेश मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज टोकवाडी येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
      टोकवाडीचे उपसरपंच डॉ. संदीप काळे व युवक कार्यकर्ते गणेश मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र मंडळाचेवतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवार दिनांक २५ जुन रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा परिषद शाळा टोकवाडी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a comment