तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 25 June 2020

किन्होळा बु. येथील राष्ट्रीय पेयजल योजनेचं भूमिपूजन सौ.प्रेरणाताई वरपुडकर यांच्या हस्ते संपन्न!


प्रतिनिधी
पाथरी:- मानवत तालुक्यातील किन्होळा बु. येथील पाणीपुरवठ्या साठी जि.प.सदस्य समशेर वरपुडकर यांनी विशेष पाठपुरावा करून राष्ट्रीय पेयजल योजनेतून ६० लक्ष रुपये निधी मंजूर करून आणला होता. या कामाचं भूमिपूजन  नुकतेच महिला प्रदेश काँग्रेस च्या जनरल सेक्रेटरी सौ.प्रेरणाताई वरपुडकर यांच्या हस्ते करण्यात आलं. तसेच १४ व्या वित्तआयोगा मार्फत होणाऱ्या विविध विकास कामांचं भूमिपूजन प्रेरणाताई वरपुडकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सरपंच दादा कदम, जि.प.सदस्य बाबुरावजी नागेश्वर, तालुकाध्यक्ष सिध्देश्वर लाडाने, ऋषिकेश बारहाते, तुकाराम साठे सर, प्रदीप कदम यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a comment