तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 27 June 2020

मंगरुळपीर येथे सामाजिक ऊपक्रम राबवणार्‍या अंगनवाडी सेविका व मदतनिसांचा सत्कारपुरोगामी पञकार संघनेचा पुढाकार

जिल्हाध्यक्ष फुलचंद भगत यांच्या प्रमुखहस्ते सन्मानपञ वितरण

मंगरूळपीर-कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक दायित्व निभावून कार्य करणार्‍या कर्तुत्ववान अंगनवाडी सेविका आणी मदतनिस या सामाजिक ऊपक्रम राबवनार्‍या महिलांचा महाराष्ट पुरोगामी पञकार संघाकडुन "कोरोना योध्दा'म्हणून सन्मानपञ देवुन जिल्हा अध्यक्ष फुलचंद भगत यांचे हस्ते वितरीत करन्यात आले.
           सध्या कोरोना संक्रमन आजाराने सर्वञ थैमान घातले असुन जनजीवनही विष्कळीत झाले आहे.संपूर्ण देशात कोरोना आजाराचा झपाट्याने फैलाव होत असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे.या आजाराला आळा घालण्यासाठी पोलिस ,डाॅक्टर्स, परिचारिका, सफाई कामगार व विविध विभागांचे अधिकारी जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत. याच उदात्त भावनेतून मंगरुळपीर येथील स्वयंसेवी आणी सामाजीक कार्यकर्त्यांचेही कार्य ऊल्लेखनिय आहे.या कार्याची ईतरांनीही प्रेरणा घेणे जरुरीचे आहे.कोरोणाविषयक जनजागृती,विविध माध्यमातुन मदत,प्रशासनाशी समन्वय या बाबींची दखल घेवुन महाराष्ट पुरोगामी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात आणी वाशिम जिल्हा अध्यक्ष फुलचंद भगत यांचे ऊपस्थीतीत मंगरुळपीर तालुक्यातील अंगनवाडी सेविका आणी मदतनिस महिलांचा 'कोरोना योध्दा'सन्मानपञ देवुन सत्कार करन्यात आला.यावेळी पञकार रमेश मुंजे,डोंगरे,वैशाली राऊत,कांताबाई मिसाळ,किरण मिसाळ,पार्वती मिसाळ,सिंधुबाई गावंडे,रेखा मनवर,नयना डोंगरदिवे,रिना भगत,वैशाली भगत,सारिका राऊत,अनिता वाघमारे,निता राऊतइंदिरा चिपडे,सुनिता भगत,पदमिना गावंडे,वैशाली चिपडे आदी महिलांची ऊपस्थीती होती.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206
      9763007835

No comments:

Post a comment