तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 29 June 2020

'स्व' ची जाणीव झाल्याशिवाय मानवी जिवन सुखकर होणार नाही-सारीका दिदीओम शांती ध्यान केन्द्र येथे वृक्षारोपण संपन्न

 मंगरुळपीर-(फुलचंद भगत) प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या स्थानिक ओम शांती ध्यान केन्द्र येथे संचालिका सारिका दिदी यांनी मानवी जिवनाचे कल्याण करायचे असल्याच स्वतःला आधी ओळखणे गरजेचे आहे.जोपर्यत प्रत्येकाला स्व ची जाणीव होणार नाही तोपर्यत जिवन सुखकर बनणार नाही,सर्व सृष्टीला नियंञीत करणारी जी शक्ती आहे त्याविषयी मन एकाग्र करुन ध्यानधारणा करा,एकमेकांशी सलोखा आणी प्रेमाने वागुन आपण आनंददायी जिवन जगावे असा मोलाचा संदेश आपल्या मधुर वाणीतुन दिला.यावेळी श्रीमती विद्याबाई वसंतराव भारस्कर यांचे 75 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी श्रीमती विद्याबाई यांना व ध्यान केन्द्राच्या संचालिका बी.के. सारीका दिदी यांचे हस्ते विविध गुलाबपुष्प व पामचे रोपांचे वृक्षारोपण  करण्यात आले.संचालीका बी. के. सारीकादिदी यांनी प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या कार्याबाबत सविस्तर अशी माहिती देवून या संस्थेचे सेवाकार्य 150 देशात चालू असुन यामुळे मानवी जीवन जगण्याच्या शैलीत बदल होतो व आत्मिक शांती लाभते तसेच प्रत्येकाने ओम शांती आध्यात्मिक अभ्यासक्रमाचा सात दिवसांचा कोर्स करावा असे सांगितले.सदर कार्यक्रमास गौरी दिदी,संजय सारडा, पुरुषोत्तम देशमुख, गजेंद्र बजाज, संजय टोचंर,जगतापभाई, सुधाकर क्षीरसागर,रमेश मुंजे, फुलचंद भगत,प्रशांत कोर्डे उपस्थित होते. वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित राहल्याबद्दल राजेश भारस्कर यांनी सर्वांचे आभार मानले .

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206
     9763007835


No comments:

Post a comment